Chara Depot : चाळीस दुष्काळी तालुक्यांत उभारणार चार डेपो

Fodder Shortage : राज्यात दुष्काळ जाहीर केलेल्या ४० तालुक्यांतील पशुधनाचा विचार करता ३१ऑगस्टपर्यंत चारा डेपो उभा करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
Fodder Scarcity
Fodder Scarcity Agrowon

Mumbai News : राज्यात दुष्काळ जाहीर केलेल्या ४० तालुक्यांतील पशुधनाचा विचार करता ३१ऑगस्टपर्यंत चारा डेपो उभा करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. सध्या राज्यात १५ जुलैपर्यंत पुरेल इतका चारा असल्याचा दावा राज्य सरकार करत असून, दुष्काळी अनिश्‍चित परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, दुष्काळी भागात तातडीने चारा, पाणी व अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून जनतेला दिलासा देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (ता. ६) मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासनास दिले. राज्यात मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे.

Fodder Scarcity
Fodder Scarcity : अवकाळीने गोधनाच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर

अनेक ठिकाणी पाणीसाठे आटत चालले असून मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लोकसभा आचारसंहितेमुळे आणखी बिकट झाली होती. प्रशासकीय पातळीवर तोकड्या उपाययोजना आखल्याचा आरोप होत होता. प्रत्यक्षात नागरिकांचे हाल होत असल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली होती.

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राज्य सरकारने आता चारा डेपो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी चारा छावण्या किंवा डेपो उभारण्यास विरोध केला होता. मात्र, दुष्काळावरून नागरिकांत असंतोष असल्याने अखेर राज्य सरकारने चारा डेपो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Fodder Scarcity
Fodder Crop : चारा पिकांचे ४७ हजार ९२७ हेक्टरवर नियोजन

हे डेपो चार ते पाच गावांसाठी असतील पशुधनाची संख्या, चारा टंचाईची तीव्रता, पशुसंवर्धन विभागाचा अहवाल विचारात घेऊन गावे निश्चित करावेत, असे आदेश दिले आहेत. स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन गावांची संख्या कमी अधिक करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

या डेपोंचे संचालन सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या, दूध खरेदी-विक्री संघ, इतर सेवाभावी संस्था, तसेच चारा छावण्या ज्या संस्थांमार्फत चालविल्या जातात त्यांनाच डेपो चालविण्यास देण्यात येणार आहेत. चा-याचे नुकसान झाल्यास ती रक्कम जिल्हाधिकाऱ्यांनी डेपो चालकांकडून वसूल करावी.

राज्यात ५१२ टन हिरवा चारा

सध्या राज्यात ५१२. ५८ टन हिरवा चारा उपलब्ध असल्याचा अहवाल पशुसंवर्धन विभागाने दिला आहे. पशुधनाचा विचार करता हा चारा १५ जुलैपर्यंत पुरेल असे विभागाचे म्हणणे आहे. तसेच १४४.४५ टन वाळलेला चारा उपलब्ध असून तो ३० जूनपर्यंत पुरेल. तरीही दुष्काळी परिस्थिती विचारात घेता काही भागात चाराटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे चारा डेपो सुरू करण्यात येणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com