Raju Shetti: फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर कडक कारवाई करा, राजू शेट्टी यांची मागणी; एसपी महेंद्र पंडित यांची घेतली भेट

Sugarcane cutting labor Mukadam : कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील ऊस वाहतूकदारांची ऊस तोडणी मजूर मुकादमाकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे.
Raju Shetti
Raju ShettiAgrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील ऊस वाहतूकदारांची ऊस तोडणी मजूर मुकादमाकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. यात २०२१ पासून वाढ झाली आहे. यामुळे दिलेल्या पैशांच्या हमीपोटी वाहतूकदारांवर कारखाना प्रशासनाकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. याचा त्रास वाहतूकदारांना होत आहे. मात्र गुन्हे दाखल असणारे ऊस तोडणी मजूर मुकादम मोकळे अन् मोकाट फिरत आहेत. त्यांच्याविरोधात फिर्याद देऊनही पोलिस प्रशासनाकडून कोणतीच कारवाई झालेली नाही. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा पोलिसप्रमुख महेंद्र पंडित यांची शनिवारी (ता.३१) भेट घेतली. तसेच ज्या मुकादमांच्याविरोधात वाहतूकदारांनी फिर्याद दिली आहे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

यावेळी संदीप राजोबा, प्रविण शेट्टी, रावसो अबदान, विठ्ठल पाटील, विनोद पाटील, अनिल हळदणकर, चव्हाण बापू, दादा पाटील, प्रकाश पोवार, तानाजी पाटील, दत्ता बाबर, दत्ता पेडणेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Raju Shetti
Raju Shetti : ...तर त्रिदेव असलेल्या सरकारला घरी बसण्याची वेळ येईल; सोयाबीन आणि मक्याच्या भावावरून राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

बीड, धुळे, उस्मानाबाद, परभणी, लातूर, औरंगाबाद, जालना जिल्ह्यासह साताऱ्यातील मान तालुक्यातील ऊस तोडणी मजूर मुकादम मनुष्यबळ पुरवतात. त्याचबरोबर विजापूर इंडी आणि मध्यप्रदेशातील काही ऊस तोडणी मजूर महाराष्ट्रात येतात. या मजूर मुकादमांकडून ऊस वाहतूकदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते. याबाबत वाहतूकदारांकडून राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये पोलिस प्रशासनाकडे तक्रार करण्यात आल्या आहेत. मात्र यावर कोणतीच कारवाई सुरू नसल्याचे समोर आले आहे. याबाबतच शेट्टी यांनी जिल्हा पोलिसप्रमुख पंडित यांची भेट घेतली.

तत्कालिन अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ पोलिस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या ऊस तोडणी मजूर मुकादमांविरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. तसेच ऊस वाहतूकदारांनी मुकादमांविरोधात तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले होते. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ११५० गुन्ह्यांची नोंद झाली. तर ४४५ गुन्हे न्यायालयात दाखल झाले. कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ऊसतोड मजूर आणि टोळी मुकादमांकडून तब्बल २०२१-२०२२ आणि २०२२ ते २०२३ या गळीत हंगात ४८६ कोटींची फसवणूक झाली आहे. तर ही रक्कम कारखान्यांच्या हमीपत्रानुसार आहे. पण टोळी करताना १० ते १५ लाख रूपये मोजावे लागतात. याप्रमाणे २ वर्षात किमान १ हजार कोटींच्यावर फसवणूक झाल्याचा दावा स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेने केला आहे.

Raju Shetti
Raju Shetti : हमीभाव, कर्जमुक्तीसाठी निर्णायक आंदोलन करणार

सध्याचे जिल्हा पोलिसप्रमुख महेंद्र पंडित यांच्याकडून याबाबत कोणतीच हालचाल होत नसल्याचे उस उत्पादक शेतकऱ्यांसह ऊस वाहतूकदारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तर बलकवडे यांनी स्थापन केलेले पथक नेमके कोठे आहे? असा सवाल आता फसवणूक झालेल्या ऊस वाहतूकदारांकडून केला जात आहे. पण मराठा आरक्षणाच्या हा मुद्दा रेंगाळला होता. आता पुन्हा यावर काम केले जात असल्याचे पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.

यावेळी शेट्टी यांनी, ऊस तोडणी मजूर मुकादमाकडून ऊस वाहतूकदारांची झालेल्या फसवणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे दाखल झाल्याचे पोलिसप्रमुख पंडित यांना सांगितले. तसेच अनेक मुकादमांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई करून वसुलीबाबत विशेष प्रयत्न केले. त्यावरून मोठी चर्चा झाली. मात्र वाहतूकदारांची समस्या काही सुटलेली नाही. त्यामुळे ज्या मुकादमांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी शेट्टी यांनी यावेळी केली.

यावरून पोलिसप्रमुख पंडित यांनी मुकादमांच्याविरोधात एनबीडब्ल्यू वारंट जारी करण्यासह कारवाई करण्याबाबत संबधित विभागास सुचना दिल्या आहेत. यादरम्यान संघटनेकडून कारखाना प्रशासन शेतकरी अथवा वाहतूकदारांची वाहने परस्पर ओढून नेतं. त्याच्यावर देखील कायदेशिर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यावरून पोलिसप्रमुख पंडित यांनी जिल्हाप्रमुख, कारखाना, बँक, पोलिस प्रशासन आणि संघटनेची बैठक लावली जाईल असे आश्वास दिले.

कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात सध्या मुकादम मोठ्या प्रमाणात फसवणूक करत आहेत. त्यामुळे थेट कारखान्यांच्या मार्फत गोपिनाथ महामंडळामार्फत तोडणी मजूर पुरवले जावेत. ग्रामीण भागातील उस तोडणी कामगारांनाही गोपिनाथ महामंडळात सामाविष्ट करून लाभ देण्यात यावा.
- संदिप राजोबा, सुकानू समिती प्रमुख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com