Shivanand Patil Controversial Statement : काँग्रेसच्या माजी मंत्र्याचे शेतकऱ्यांवर वादग्रस्त विधान; व्हिडिओ व्हायरल

Karnataka Former Minister Shivanand Patil Remark on Farmer : कर्नाटक सरकारमधील अनेक विषय सध्या चर्चेत येत आहेत. यादरम्यान कर्नाटकचे माजी मंत्री शिवानंद पाटील यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून त्यात त्यांनी शेतकऱ्यांवर विधान केले आहे. यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.
Shivanand Patil
Shivanand PatilAgrowon
Published on
Updated on

Bengaluru News : कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारमधील नेत्यांची वादग्रस्त विधाने आता समोर येत आहेत. यादरम्यान माजी ऊस विकास मंत्री शिवानंद पाटील यांचे एक विधान चांगलेच चर्चेत आले आहे. ज्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे.

त्यांनी, ' कर्ज माफ व्हावे म्हणून येथील शेतकरी दरवर्षी दुष्काळाची कामना करतात' असे वादग्रस्त विधान पाटील यांनी केलं आहे. याच्याआधी ते, शेतकरी आत्महत्येबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडले होते.

ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना कृष्णेचे पाणी, वीज मोफत मिळत आहे. वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी खते आणि बियाणेही मोफत दिली आहेत. अशा स्थितीत त्यांची एकच इच्छा दिसत आहे, ती म्हणजे दरवर्षी दुष्काळ पडावा म्हणजे त्यांचे कर्ज माफ होईल.

Shivanand Patil
जतला पाणी देण्याचे आश्‍वासन खोटे : सिद्धरामय्या

या वादग्रस्त विधानानंतर भाजपने काँग्रेसवर निशाना साधला आहे. तसेच, सिद्धरामय्या यांचे मंत्रिमंडळ “मूर्खांनी भरलेले” असल्याची टीका भाजपने केली आहे. "शेतकरी विरोधी सरकार" काँग्रेस शेतकऱ्यांची थट्टा करत असून त्यांचा अपमान करत असल्याचे देखील भाजपने X वर म्हटलं आहे.

Shivanand Patil
सिद्धरामय्या बदामीतून विजयी; चामुंडेश्वरीत पराभव

दरम्यान माजी मंत्री शिवानंद पाटील यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक सोशल मीडियावर टीकेची झोड उडली आहे. याविधानावरून राजकीय वादंग सुरू झाल्यानंतर माजी मंत्री शिवानंद पाटील यांनी, शेतकऱ्यांच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता असे म्हणत सावरासावर केली आहे.

लग्नात नोटा उडवल्या

माजी मंत्री शिवानंद पाटील हे वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतानाच त्यांचा दुसराही व्हिडिओ समोर आला होता. ज्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. या व्हिडिओत ते एका लग्न समारंभात नोटा उडवताना दिसत आहेत.

त्यातील काही नोटा त्यांच्या पायावर पडल्या होत्या. यावरही त्यांनी स्पष्टीकरण देताना, ते केवळ लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी गेले होते. त्याचा पैशाशी काहीही संबंध नव्हता असे म्हटलं होतं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com