Mumbai News: हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसच्या माजी आमदार प्रज्ञा सातव आणि सोलापूर दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या समर्थकांसह गुरुवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला..भाजपप्रवेश करण्यापूर्वी सातव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.भाजपप्रवेशामागील भूमिका स्पष्ट करताना सातव म्हणाल्या, की स्वर्गीय राजीव सातव यांनी हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी अथक प्रयत्न केले..Pradnya Satav Resigns: काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश .राजीव यांच्या विकासाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या कार्यात साथ देण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे..Congress leaders join BJP : नांदेडच्या राजकारणात भूकंप? माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर.या वेळी बोलताना माने म्हणाले, की पंतप्रदान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असलेला विकास आणि भाजपची विचारसरणी यांनी प्रेरित होऊन माझ्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करत आहे. निष्ठेने काम करून भाजपची विचारधारा तळागाळात पोहोचविण्याचा प्रयत्न करेन..सातव यांच्यासह पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये हिंगोली येथील काँग्रेसचे जिल्हा परिषद माजी सदस्य शिवाजीराव मस्के, जिल्हा प्रवक्ता तथा उपाध्यक्ष विलास गोरे, कळमनुरीचे तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा औंढा नागनाथचे तालुकाध्यक्ष पंकज जाधव, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नामदेवराव चव्हाण आदींचा समावेश आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.