चंद्रशेखर भडसावळेEnvironmental Issue: वणवा लागतो तेव्हा एकमेकांवर अवलंबून असलेली संपूर्ण जीवसृष्टी भस्मसात होते. हे एक भयानक दुष्टचक्र आहे.एकेकाळी पावसाळ्यात हिरवा शालू पांघरलेले डोंगर आज उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भकास दिसतात. वणवे रोखण्यासाठी ग्रामस्तरावर स्वयंप्रेरित यंत्रणा आणि वन-रक्षक गट उभे राहिले पाहिजेत. जळालेल्या भागांत पुन्हा स्थानिक प्रजातींची वृक्षलागवड करून निसर्गचक्र सांधण्याचे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे..महाराष्ट्र आज एका भयावह वास्तवाशी सामना करत आहे, वणव्याच्या झळांनी काळवंडलेलं भूमीचित्र. राज्यातील मोकळ्या जागा, वनजमिनीत, शेतकऱ्यांची शेते आणि बांध असा सर्वच भूभाग वणव्याच्या भक्षस्थानी पडलेला दिसत आहे. सध्या राज्यातील कोणत्याही भागातून रस्त्याने प्रवास करताना, डोळ्यांसमोर जळालेल्या, खाक झालेल्या लाखो हेक्टर जमिनीचे विदारक चित्र उभे रहाते. एकेकाळी पावसाळ्यात हिरवा शालू पांघरलेले डोंगर आज उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भकास दिसतात..Forest Fire: तेंदूपत्ता हंगामात नागझिऱ्यात वणवे लागण्याच्या घटनांमध्ये वाढ.हरवलेली संवेदनशीलताया सगळ्यातील सर्वांत दुःखद पैलू म्हणजे दरवर्षी हेच घडत असताना, यावर सकारात्मक चर्चा किंवा ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. उलट, वणवे लावून देणारी विकृत मानवी मानसिकता वाढताना दिसते आहे. ही केवळ पर्यावरणीय नव्हे, तर सामाजिक अधःपतनाची लक्षणे आहेत. आमचे वनवासी सहकारी परशुराम आगिवले सांगतात, की १५-२० वर्षांपूर्वी वणवे क्वचित लागत आणि लागल्यास अख्खं गाव ते विझवायला धावून जात असे. पण आता वणवा रोजचाच प्रकार झाला आहे. ‘रोजचं मरे त्याला कोण रडे’ अशी समाजाची अवस्था झाली आहे..भुकेची आग आणि मानवी संघर्षवणव्याची दाहकता समजून घेण्यासाठी परशुराम भाऊंनी पाहिलेलं एक दृश्य पुरेसं आहे. शहापूर जवळच्या जळालेल्या जंगलामध्ये रस्त्याच्या कडेला एक नीलगाय भरकटलेली होती. जिकडे तिकडे जळून खाक झाल्यामुळे चाऱ्याच्या शोधामध्ये ती व्याकूळ होऊन भटकत होती. पोटासाठी ती काहीही करायला तयार होती..त्याच परिसरातील सगुणा रिजनरेटिव्ह तंत्रज्ञान पद्धतीने शेती करणारे नामदेव हरड या शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली. त्याने मोठ्या कष्टाने भाजीपाला पिकविला होता, पण जंगलात अन्नाचा थेंबही उरला नसल्याने, नीलगाईंनी चक्क पाच फूट उंच कुंपणावरून उड्या मारून सगळा भाजीपाला फस्त केला. वणव्यामुळे जंगलातील त्यांचे पोटभरीचे साधन नष्ट झाल्यामुळे त्यांना मानवी अन्न निर्मितीकडे कूच करावी लागली. हा केवळ प्राणी आणि शेतकरी यांचा संघर्ष नाही; हा वणव्याने निर्माण केलेला कृत्रिम दुष्काळ आहे..जीवसृष्टीची राख-रांगोळीवणवा लागतो तेव्हा एकमेकांवर अवलंबून असलेली संपूर्ण जीवसृष्टी भस्मसात होते. हे एक भयानक दुष्टचक्र आहे. जमिनीवरील कीटक जळतात, त्यामुळे त्यांना खाणारे सरडे आणि घोरपडी नष्ट होतात. त्यांच्यावर जगणारे मुंगूस, पक्षी अन्नावाचून मरतात किंवा स्थलांतर करतात. ससा, हरिण यांसारखे तृणभक्षी प्राणी अन्नावाचून मरतात किंवा लोकवस्तीकडे धाव घेतात. या सर्वांवर जगणाऱ्या वाघ आणि बिबट्यांसारख्या हिंस्र प्राण्यांच्या अन्नाची साखळी तुटते. परिणामी, आज बिबट्यांना शिकारीसाठी शहरांमध्ये येऊन डोकावे लागत आहे. एका वणव्यामुळे निसर्गाच्या एका संपूर्ण पिढीची राखरांगोळी होत आहे..आटणारे पाण्याचे स्रोतआमच्या नेरळ येथील प्रयोगातून एक धक्कादायक आणि शास्त्रीय वास्तव सिद्ध झाले आहे. वणव्यामुळे जंगलातील पाण्याचे स्रोत एखाद्या जादू केल्याप्रमाणे आतून आटून जातात. जमिनीवरील पालापाचोळा जळाल्यामुळे जमिनीची आर्द्रता धरून ठेवण्याची क्षमता संपते. माती तापते आणि भूगर्भातील पाणी वर येण्याऐवजी खोल निघून जाते. जे झरे बारमाही वाहत असायचे, ते वणव्याच्या एका झळाळीत कायमचे कोरडे पडतात..Forest Fire: उन्हाळ्यात जंगलांना वणव्याचा विळखा.रानमेवा नष्ट आणि पक्ष्यांचे स्थलांतरउन्हाळ्याच्या दिवसात जंगलात मिळणारी नैसर्गिक फळे आटूरणे, तोरणे, करवंद, उंबर, चिखल्या, आसणं अशी नानाविविध फळे वणव्यामुळे नष्ट झाली आहेत. हा रानमेवा तेथील स्थानिक पक्ष्यांचे आवडते खाद्य होते. खाद्यच नष्ट झाल्यामुळे नैसर्गिक पक्षांचा प्रभाव कमी झाला आहे. याउलट, शहरीकरणाने आधार दिलेल्या पारव्यांसारख्या (कबूतर) पक्ष्यांची संख्या अनियंत्रितपणे वाढली आहे..हेच पारवे आता शेतकऱ्याला पेरणी आणि कापणीच्या वेळेला प्रचंड त्रासदायक ठरत आहेत. हे सर्व त्या वणव्याचेच दूरगामी परिणाम आहेत..पर्यावरणीय असमतोलसूक्ष्मजीवांची हत्यामातीचा जिवंतपणा टिकवून ठेवणारे सूक्ष्मजीव वणव्याच्या प्रचंड उष्णतेने नष्ट होतात, ज्यामुळे जमीन नापीक होते.हवामान बदलवणव्यामुळे निर्माण होणारा धूर आणि कर्बवायू जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाला गती देतो.मृदाक्षय आणि पूरस्थितीझाडे आणि गवत जळाल्यामुळे जमीन उघडी पडते. पावसाळ्यात या मातीची प्रचंड धूप होते, पाणी जमिनीत मुरत नाही आणि परिणामी पूरस्थिती अधिक गंभीर बनते..भूस्खलनमुळे जळाल्यामुळे डोंगराची पकड ढिली होते. माळीण किंवा इर्शाळवाडीसारख्या दरडी कोसळण्याच्या आपत्तींच्या मुळाशी या वणव्यांचा मोठा वाटा आहे.जागे होऊयात...झालेला उशीर फार मोठा आहे. पण अजूनही वेळ गेलेली नाही, जर आपण सर्वांनी मिळून तातडीने कृती केली नाही तर वणवा ही केवळ आग नाही तर तो आपल्या भविष्याला भस्म करणारा धोका आहे.लोकसहभागवणवे रोखण्यासाठी ग्रामस्तरावर स्वयंप्रेरित यंत्रणा आणि ‘वन-रक्षक’ गट उभे राहिले पाहिजेत..प्रबोधन‘वणवा लावणे हा निसर्गाचा खून आहे’ ही जाणीव समाजातील प्रत्येक घटकात रुजायला हवी.प्रशासन आणि कडक कायदेवणवा लावणाऱ्या प्रवृत्तींना शोधून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई होणे अत्यावश्यक आहे.नैसर्गिक पुनरुज्जीवनजळालेल्या भागांत पुन्हा स्थानिक प्रजातींची वृक्ष लागवड करून निसर्गचक्र सांधण्याचे प्रयत्न व्हायला हवेत.- चंद्रशेखर भडसावळे ९८२२२८२६२३(लेखक नेरळ, जि. रायगड येथील प्रयोगशील शेतकरी आणि सगुणा रूरल फाउंडेशनचे संस्थापक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.