Fishing
Fishing Agrowon

Fishing : वांब माशासाठी खवय्यांची झुंबड

Latest Agriculture News : रायगड जिल्ह्यातील अनेक गावांत गोड्या पाण्यात मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते. ही मासेमारी बोटीने अथवा नदीकिनाऱ्यावर जाळी, गळाच्या साह्याने केली जाते.
Published on

Poladpur News : रायगड जिल्ह्यातील अनेक गावांत गोड्या पाण्यात मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते. ही मासेमारी बोटीने अथवा नदीकिनाऱ्यावर जाळी, गळाच्या साह्याने केली जाते. यामध्ये खवल, मळ्या, दांडाळी, पांढरा मासा हे उन्हाळ्यात गळाने मिळतात. मात्र, पावसाचा जोर कमी होताच गणेशोत्सवानंतर शिंगटी, वांब, शिवडा हे मासे गळाने पकडले जातात.

आताही पोलादपुरात नदीकिनारी गळाने मासे पकडण्यास ग्रामस्थांनी सुरुवात केली आहे. या गळाला लागत असलेल्या वांब माशाला पोलादपूर बाजारपेठेत २०० ते २५० रुपये भाव मिळत असल्याने आदिवासी बांधवांना रोजगार मिळत आहे.

Fishing
Fish Farming : कोळंबी संवर्धनातून निर्माण केली यशाची पायवाट

पोलादपूर तालुका हा दुर्गम असून सावित्री, ढवळी, कामथी अशा नद्या येथून वाहतात. यामध्ये सावित्री नदी मुख्य मानली जाते. या नद्यांमध्ये आदिवासी बांधव जाळे टाकून बाराही महिने मासेमारी करतात. हे मासे मुख्य बाजारात विक्रीसाठी आणून चार पैसे मिळवतात.

Fishing
Fish Migration : माशांचे स्थलांतर गंभीरच!

पण काही स्थानिक नागरिक मासे विकत न घेता आवडीने स्वतः गळ पद्धतीचा अवलंब करतात. सध्या गणेशोत्सवानंतर मासेमारी करण्यासाठी नदीकिनारी गळ लावला जात आहे. ऑक्टोबरच्या कालावधीत मिळणारा वांब आणि शिंगटी मासा सध्या आदिवासी व पोलादपुरकरांची पसंती ठरत आहे.

आदिवासींना या वांब माशाला पोलादपूर बाजारपेठेत २०० ते २५० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे तो पकडण्यासाठी धडपड करत आहेत. स्थानिक नागरिकही सायंकाळच्या वेळेस गळ घेऊन स्वतः नदीकाठावर बसत आहेत. गळ टाकल्यानंतर तीन ते चार वांब मासे मिळतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com