Food Security : अल्पभूधारकांकडे लक्ष न दिल्यास अन्न सुरक्षा धोक्यात

इजिप्तमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या हवामान शिखर परिषदेत (सीओपी २७) देशांचे प्रमुख अन्न सुरक्षा आणि हवामान बदल यावर चर्चा करणार आहेत. सोमवार (ता. ७) पासून या परिषदेला सुरुवात झाली आहे.
Food Security
Food SecurityAgrowon
Published on
Updated on

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः साडेतीन कोटी शेतकऱ्यांचे (Farmer) नेतृत्व करणाऱ्या संघटनांनी जगातील राष्ट्रनेत्यांना एका खुल्या पत्राद्वारे सोमवारी (ता. ७) इशारा दिला की, अल्पभूधारक शेतकऱ्यांना (Marginal Farmer) पतपूरवठा (Agriculture Credit) करून आणि त्यांना वैविध्यपूर्ण शेतीकडे वळविण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, अन्यथा अन्न सुरक्षा (Food Security) धोक्यात येणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.

इजिप्तमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या हवामान शिखर परिषदेत (सीओपी २७) देशांचे प्रमुख अन्न सुरक्षा आणि हवामान बदल यावर चर्चा करणार आहेत. सोमवार (ता. ७) पासून या परिषदेला सुरुवात झाली आहे.

Food Security
देशातून Dairy Products Export मध्ये 63 Percent वाढ | Milk Rate | Agrowon

पत्रामधून काय इशारा दिला...

जागतिक अन्न प्रणाली हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी सुसज्ज नाही. त्यासाठी आपण जागतिक तापमान १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित करणे. तसेच जगाला अन्न पुरवू शकेल अशी अन्न प्रणाली तयार करणे, याला (सीओपी२७) मध्ये प्राधान्य देणे आवश्यक आहे. तसेच सहारा आणि उप-सहारा आफ्रिका यांसारख्या प्रदेशातमध्ये खाल्ल्या जाणाऱ्या अन्नापैकी ८० टक्के उत्पादन अल्पभूधारक घेतात. त्यामुळे जागतिक अन्न सुरक्षेसाठी अल्पभूधारक हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com