FSSAI : ‘A1’ आणि ‘A2’ दुधावरून FSSAI चा यू-टर्न; बाजारात दुधाची विक्री सुरूच राहणार

FSSAI On A1 And A2 Milk : काहीच दिवसांपूर्वी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात एफएसएसएआयने बाजारात होणाऱ्या ‘A1’ आणि ‘A2’ दुधावरून कठोर भूमिका घेतली होती.
FSSAI On A1 And A2 Milk
FSSAI On A1 And A2 MilkAgrowon
Published on
Updated on

Pune News : फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात एफएसएसएआयने A2 दूध असल्याचा दावा करणाऱ्या सर्व प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली होती. नियमांचा बडगा उगारत एफएसएसएआयने बंदी घातली होती. मात्र पाचच दिवसांच्या आत एफएसएसएआयला आपल्या निर्णयावरून यू-टर्न घ्यावा लागला असून आदेशच रद्द करावा लागला आहे. यामुळे हानिकारक असणाऱ्या ‘A1’ आणि ‘A2’ दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे बाजारात विक्री सुरूच राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

गेल्या आठवड्यात २१ तारखेला एफएसएसएआयने नियमांचे कारण देत A2 दुधाचा दावा करणाऱ्या सर्व प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली होती. ज्यात एफएसएसएआयने तूप आणि लोणी यांचा विशेष उल्लेख केला होता. तर A1 आणि A2 दुधात गुणवत्तेच्या कोणताही फरक नाही. मात्र A2 दुधाची गुणवत्ता अधिक चांगली असल्याचे लेबल लावून महागड्या किमतीत A2 दूध विकले जात असल्याचे म्हटले होते. तर अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, २००६ नुसार असा दावा करता येणार नसल्याचेही एफएसएसएआयने म्हटले होते.

FSSAI On A1 And A2 Milk
Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

याबाबत एफएसएसएआयने डेअरी कंपन्यांना त्यांच्या वेबसाइटवरून असे दावे त्वरित काढून टाकण्यास सांगितले होते. याबाबत बंदीचे आदेश एफएसएसएआय कार्यकारी संचालक एनोशी शर्मा यांनी जारी केले होते. पण आता एफएसएसएआयला आपला निर्णय मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे. ‘A1’ आणि ‘A2’ दुधाबाबत घेतलेला निर्णय मागे घेत असल्याचे पत्र संचालक अनुपालन राकेश कुमार यांना काढावे लागले आहे.

FSSAI On A1 And A2 Milk
FSSAI : बॉटलवरील १०० टक्के फळांच्या रसाचा दावा काढून टाका; ज्यूस कंपन्यांना एफएसएसएआयचा दणका

दरम्यान एफएसएसएआय निर्णय मागे घेण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) प्रशासकीय समितीचे सदस्य वेणुगोपाल बदरवाडा यांनी दबाव आणल्याचे बोलले जात आहे. बदरवाडा यांनीच एफएसएसएआयच्या आदेशावरून तीव्र विरोध केला होता. तर बदरवाडा यांनी याच मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एफएसएसएआयने आपला आदेश मागे घ्यावा, अशी मागणी केली होती. तर या प्रकरणी तज्ज्ञांची एका उच्चस्तरीय समिती स्थापना करण्याची विनंती केली होती.

तसेच समितीत मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांचे प्रतिनिधींबरोबरच आयसीएआर आणि इतर संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असावा असेही बदरवाडा यांनी म्हटले होते. तर एफएसएसएआच्या आदेशाविरोधात न्यायालयात दाद मागू असा इशाराही वेणुगोपाल बदरवाडा यांनी दिला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com