Fodder Seed Subsidy Rules Relaxed: राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा उत्पादनाबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चारा उत्पादन कार्यक्रमांतर्गत चारा बियाणे, ठोंबे वाटप योजनेच्या अटी आणि शर्ती शिथिल करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे अनुदान तत्वावर चारा बियाण्यांसाठी आता वर्षातून एकदाच नव्हे तर एकापेक्षा जास्त वेळा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वैयक्तिक लाभासाठी स्वतःचे ३ ते ४ पशुधनाची अटही शिथिल करण्यात आली आहे. .याबाबतचा शासन निर्णय पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास विभागाने जारी केला आहे. याआधी ९ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये, राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना (जिल्हा वार्षिक योजना) लागू करण्यात आली. या योजनेनुसार, वैरण उत्पादन कार्यक्रमांतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना १ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत वैरण उत्पादन घेण्यासाठी १०० टक्के अनुदान तत्वावर ४ हजार रुपये किमतीचे चारा बियाणे दिले जाते. तसेच शेतकरी समूह गटासाठी ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत २० हजार किमतीचे चारा बियाणे देण्यात येते. .Fodder Transport Bans: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातून चारा बाहेर नेण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.सदर योजना वर्षातून एकदा राबविण्यात येत असल्याने लाभार्थ्यांना वर्षातून एकदाच लाभ मिळणे अभिप्रेत होते. पण चारा उत्पादनासाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध असल्याची खातरजमा करुन एकापेक्षा जास्त वेळी लाभ दिला जाणार आहे. .Fodder Crop Cultivation: रब्बीत चाऱ्याची लागवड करा, सरकार हमीभावाने विकत घेणार- मुख्यमंत्री फडणवीस.दुष्काळग्रस्त स्थितीमुळे चारा टंचाईच्या गंभीर संकटावर मात करण्यासाठी चारा उत्पादनास प्राधान्य देणे आवश्यक झाले आहे. ही बाब विचारात घेवून वैरण उत्पादन कार्यक्रमांतर्गत चारा बियाणे/ठोंबे वाटपासाठी विहित करण्यात आलेल्या अटी २०२६-२७ या वर्षासाठी शिथिल करण्यात आल्या आहेत..अनुदानाचे स्वरुपया योजनेचा वैयक्तिक लाभ घेण्यासाठी स्वतःकडे किमान ३ ते ४ पशुधन असण्याची अट होती. पण ही अट २०२६-२७ साठी शिथिल करण्यात आली आहे. चारा उत्पादन करण्यासाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध असल्यास वैयक्तिक लाभार्थ्यास ४ हजार रुपये किमतीची बियाणे एकापेक्षा जास्त वेळेस (पाणीसाठा उपलब्ध असलेला प्रथम लाभाची मागणी नसलेला अर्जदार उपलब्ध नसल्यास) मिळतील. तसेच शेतकरी समूह गटास २० हजार रुपये किमतीची बियाणे एकापेक्षा जास्त वेळेस मिळतील, असे शासन निर्णयात नमूद केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.