Fodder Cultivation : रब्बीत एक लाख हेक्टरवर चारा पिके

Fodder Crop : अहिल्यानगर जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय, पशुपालनाला शेतकरी प्राधान्य देत असल्याने शेतकऱ्यांचा इतर पिकांबरोबरच चारा उत्पादनाला प्राधान्य राहिल्याचे दिसून येत आहे.
Fodder Cultivation
Fodder Crop Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय, पशुपालनाला शेतकरी प्राधान्य देत असल्याने शेतकऱ्यांचा इतर पिकांबरोबरच चारा उत्पादनाला प्राधान्य राहिल्याचे दिसून येत आहे. यंदा रब्बीत तब्बल एक लाख १ हजार ९९८ हेक्टरवर चारा पिके घेतली आहेत. शिवाय खरीप आणि रब्बी हंगामात तब्बल एक लाख २८ हजार हेक्टरवर मका पीक लागवड केले आहे. कृषी विभागाने ही माहिती दिली.

अहिल्यानगर जिल्ह्यात शेतीला जोड म्हणून पशुपालन, दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्‍या मोठी आहे. राज्यात संकलित होणाऱ्या गाईच्या एकूण दुधापैकी अहिल्यानगर जिल्ह्यातून पंधरा ते वीस टक्के दुग्ध संकलित होते.

याशिवाय थेट ग्राहकांना म्हशीचे दुग्ध देणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे अन्य पिकांसोबत शेतकरी चारा उत्पादनालाही अधिक प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. यंदा पाण्याची स्थिती चांगली असल्याने रब्बीत तब्बल एक लाख १ हजार ९९८ हेक्टरवर चारा पिके घेतली आहेत.

Fodder Cultivation
Fodder Crop : खानदेशात चारापिकांची मुबलक पेरणी यंदा अधिक; कडबा दरात घट होण्याचे संकेत

दोन्ही हंगामात मकाचेही सव्वा लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर उत्पादन घेतले आहे. यंदा रब्बीत श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, राहाता, संगमनेर तालुक्यांत चारा पिकांचे क्षेत्र अधिक असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.

मुरघास करण्यावर भर

अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप आणि रब्बीत मका उत्पादनावर भर असतो. यंदा खरिपात ४० हजार हेक्टर तर रब्बीत ८७ हजार ७३७ हेक्टर अशी एक लाख २८ हजार हेक्टरवर मकाचे उत्पादन घेतले.

Fodder Cultivation
Fodder Crisis : वणव्यांमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर

दुग्ध व्यवसाय, पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना अनेकवेळा जनावरांच्या चारा टंचाईला सामोरे जावे लागले. हा अनुभव घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी मुरघास करत आहेत. मका उत्पादनामुळे मुरघास करण्याकडे दोन वर्षांत अधिक कल वाढला असल्याचे पशुसंवर्धन विभागातून सांगण्यात आले.

रब्बीतील चारा उत्पादन (हेक्टर)

नगर ः ७७७८, पारनेर ः १३६४५, श्रीगोंदा ः १०५८८, कर्जत ः ९७९९, जामखेड ः १७६२, शेवगाव ः १५३७, पाथर्डी ः ४१४१, नेवासा ः ६५१५, राहुरी ः १०२४७, संगमनेर ः १५५१२, अकोले ः २८९८, कोपरगाव ः ४६०६, श्रीरामपूर ः ४५२१, राहाता ः ८३५१.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com