Co-operative Societies : झिरो पेन्डसी, सहकारी संस्था बळकटीकरणावर भर

Co-operative Societies Update :तत्कालीन जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना निलंबित केल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी पदोन्नतीने बदली झालेले फय्याज मुलाणी यांनी पदभार स्वीकारत कामकाजाला सुरुवात केली आहे.
Co-operative Societies
Co-operative SocietiesAgrowon
Published on
Updated on

Nashik News : तत्कालीन जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना निलंबित केल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी पदोन्नतीने बदली झालेले फय्याज मुलाणी यांनी पदभार स्वीकारत कामकाजाला सुरुवात केली आहे.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयात काम करताना कोणत्याही विभागाची फाईल फार काळ राहणार नसल्याचे सांगत, मुलाणी यांनी, झिरो पेन्डन्सी हाच अजेंडा राबवत काम करणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील सहकारी संस्था बळकटीकरणासाठी सर्वांना विश्वासात घेऊन कामकाज करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

Co-operative Societies
Sugar Mills Election : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मुंडे बहीण-भावाची एकी?

ऑगस्ट २०१९ मध्ये मुलाणी नाशिक तालुका उपनिबंधक पदावर कार्यरत होते. तत्पूर्वी त्यांनी पुणे उपनिबंधक म्हणून काम करण्याचा अनुभव होता. तालुका उपनिबंधक असताना त्यांच्याकडे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्षभर प्रशासक म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपविली होती.

मुलाणी सोमवारी (ता. २९) जिल्हा उपनिबंधक म्हणून पदभार स्वीकारणार होते. परंतु, त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला नाही. मंगळवारी (ता. ३०) त्यांनी विभागीय सहनिबंधक विलास गावडे यांची भेट घेऊन, कागदोपत्री पदभार घेतला.

बुधवारी (ता. ३१) त्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात येऊन अधिकृतपणे सूत्रे हाती घेऊन थेट कामकाजाला सुरुवात केली. विभागातील कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी संवाद साधला. तसेच कामकाज समजावून घेत कामाला सुरुवात केली.

सहकारी संस्था, बॅंका, पतसंस्था, बाजार समित्या आदींच्या कामकाजाबाबत असलेल्या फाईल वेळेत निकाली काढण्यावर भर राहणार आहे. विनाकारण फाईल अडवणूक न करता वेळात फाइल काढावी, अशा सूचनादेखील विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्याचे मुलाणी यांनी सांगितले.

नाशिक बाजार समितीत प्रशासक म्हणून एक वर्ष कामाची संधी मिळाली. संस्थेला २० कोटींच्या नफ्यात आणून खर्च कमी केला. याच धर्तीवर विभागाचे कामकाज करण्याचा मानस असल्याचे मुलाणी यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com