Agriculture Processing : शेतीमालाच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा : डॉ. गडाख

Modern Agriculture Technology : आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब त्यासोबतच शेतमालावर पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया, शक्‍य झाल्यास ब्रॅण्डिंग असे प्रयत्न गावस्तरावर झाल्यास निश्चितच शेतमालाचा परतावा चांगला मिळण्यास मदत होईल.
Dr. Gadakh
Dr. GadakhAgrowon

Chandrapur News : आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब त्यासोबतच शेतमालावर पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया, शक्‍य झाल्यास ब्रॅण्डिंग असे प्रयत्न गावस्तरावर झाल्यास निश्चितच शेतमालाचा परतावा चांगला मिळण्यास मदत होईल, असा विश्‍वास डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे (पंदेकृवि) कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्‍त केला.

सिंदेवाही येथील विभागीय कृषी संशोधन केंद्रात आयोजित कृषी मेळावा, प्रदर्शनी व चर्चासत्रात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. डॉ. गडाख म्हणाले, ‘‘शेतीमालावर गावातच प्रक्रिया झाली तर त्यातून मूल्यवर्धनास मदत मिळेल, रोजगाराचा प्रश्‍नही सुटण्यास हातभार लागणार आहे.

Dr. Gadakh
Advance Payment : नोव्हेंबरचे अर्धे मानधन मिळणार अग्रिम स्वरूपात

कृषी विद्यापीठदेखील त्या संदर्भाने प्रयत्न करीत असून कृषी विद्यापीठ, कृषी व संलग्न विभागांनी एकत्रित येत त्या अंतर्गंत मॉडेल व्हिलेजची संकल्पना मांडली आहे. येत्या तीन वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात देखील अशा प्रकारचे गाव विकसित होईल.’’

Dr. Gadakh
Farmer Income : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर द्या

या वेळी संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, आत्मा प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर, विभागीय संशोधन केंद्राचे सह्योगी संचालक डॉ. अनिल कोल्हे, नागपूर कृषी महाविद्यालयाचे सह्योगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू, डॉ. व्ही. एस. टेकाळे, डॉ. माया राऊत, डॉ. एस.व्ही. साईप्रसाद, डॉ. विनोद नागदेवते, मच्छिंद्र रामटेके, हेमंत शेदरे यांची या वेळी उपस्थिती होती.

प्रास्ताविकातून डॉ. अनिल कोल्हे यांनी विद्यापीठाने संशोधित केलेल्या धान पिकाचे विविध वाण, कीडरोग व्यवस्थापन, बिज प्रक्रिया याविषयी माहिती दिली. डॉ. विलास खर्चे यांनी रब्बी हंगामात तेलबिया पिकांच्या लागवडीवर भर देण्यास सांगितले. प्रक्षेत्र भेटी दरम्यान शेतकरी धान कापणी, मळणी यंत्राचे प्रात्याक्षिक अनुभवले. सूत्रसंचालन डॉ. सोनाली लोखंडे यांनी केले. स्नेहा वेलादी यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com