Strawberry Rate : स्ट्रॉबेरी, अंजीरच्या दरांमध्ये चढ-उतार
Vashi Apmc Market : मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात (Mumbai APMC) डिसेंबरमध्ये येणाऱ्या अंजीर तसेच स्ट्रॅाबेरीच्या हंगामाला (Strawberry Season) अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
त्यामुळे या फळांचा हंगाम लांबणीवर पडला असून जानेवारी महिन्यात बाजारात फळांची आवक वाढल्याने स्ट्रॉबेरीचे दर ४० (Strawberry Rate) रुपयांनी उतरले असून अंजीर ५० रुपयांनी महागले आहे.
थंडीची चाहूल लागताच स्ट्रॉबेरीला अधिक बहर आला असून उत्पादन वाढले. मागील महिन्यात ५०० क्रेटप्रमाणे दाखल होणारी स्ट्रॉबेरी आता १,५०० क्रेट, तर नाशिकच्या ३-४ गाड्या अशी ६२८ क्विंटल दाखल झाली आहे.
जादा आवक झाल्याने किलोमागे ४० रुपयांनी स्वस्त झाली आहे. जानेवारीत प्रतिकिलो २०० ते ३२० रुपयांवर विक्री होणारी स्ट्रॉबेरी आता प्रतिकिलो १५० ते २८० रुपयांवर आली आहे.
यामध्ये नाशिक, महाबळेश्वर, पाचगणी, भिलारे येथून कामारोजा, विंटर, स्वीट चार्ली अशा प्रकारची आकाराने लहान मोठी, चवीला आंबट-गोड स्ट्रॉबेरी दाखल होत आहे.
तर यंदा अंजीरच्या हंगामालाही विलंब झाला आहे. बाजारात आता अंजीर कमी प्रमाणात दाखल होत आहे. आधी ५-६ गाड्या आवक होते होती. ती आता अवघ्या दोन गाड्या होत असल्यामुळे दरात वाढ झाली आहे.
महिन्याभरानंतर दुसरा बहर
आवक कमी झाल्याने प्रतिकिलो १५० ते ३०० रुपये बाजारभाव असलेले अंजीर २०० ते ३०० रुपयांवर गेले आहे. तसेच, अंजीर फळाचा पहिला बहर देखील संपला असून, महिन्याभरानंतर दुसरा बहर सुरू होणार आहे.
त्या कालावधीदरम्यान अंजिराची आवक कमी जास्त राहील, त्यामुळे दरातही चढ-उतार राहण्याची शक्यता आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.