Flower Market : कोरोना निर्बंधमुक्तीनंतर बहरला फुलबाजार

विविध सणांदरम्यान पाऊस राहिल्याने फुलांचे मोठे नुकसान झाले. तरीही मागणी, आवक, दर आदी विचार करता बाजार समितीमधील फुलांची उलाढाल सुमारे २७ कोटी रुपयांची राहिली.
Flower Market
Flower MarketAgrowon
Published on
Updated on

-गणेश कोरे

वर्षभरात फुलांच्या (Flower ) मागणीचा हंगाम श्रावण महिन्यापासून सुरू होतो. फुलांच्या मागणीमध्ये धार्मिक विधींसाठीची फुले (लूज फ्लॉवर) आणि सजावटीची फुले (कट फ्लॉवर) असे दोन प्रकार राहतात. व्रतवैकल्ये, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळीपर्यंत सुट्या फुलांना अधिक मागणी राहते. यानंतर लग्न हंगामामध्ये शोभिवंत फुलांना मागणी वाढते. तो हंगाम मे महिन्यापर्यंत असतो.

यंदाचे चित्र

फुलबाजार अडते असोसिएशनचे समन्वयक आणि अडतदार सागर भोसले म्हणाले, की दोन वर्षांत कोरोना संकटामुळे गणेशोत्सवासह धार्मिक स्थळे बंद असल्याने फुलांची मागणी घटली होती. मात्र या वर्षी कोरोना निर्बंधमुक्तीमुळे सर्वच सण उत्साहात झाले. शेतकऱ्यांनीही जास्त क्षेत्रावर लागवड केल्याने यंदा विविध फुलांची विविधता दिसून आली.

Flower Market
Sugar Factory : आर्थिक विकासाचे माध्यम : साखर कारखाने

यंदा नेमक्या उत्सवाच्या काळात सततचा पाऊस झाला. त्यामुळे फुले भिजल्याने सर्वच सणांदरम्यान एकूण आवकेत किमान ३० ते ४० टक्के फुले भिजलेली होती. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या फुलांना मागणी आणि दर चांगले राहिले.

फुलांचे ‘ट्रेंड’

गणेशोत्सव दरम्यान गणपती विराजमान होण्याच्या तीन दिवस आधी फुलांचे दर टिकून होते. त्यानंतर गौरी येण्यापूर्वी ते टिकून होते. या दरम्यान झेंडूला असणारा प्रति किलो ५० ते १०० रुपयांचा दर गणेश विसर्जनाच्या दिवशी १० ते २० रुपयांपर्यंत कमी झालेला असतो. पाच, सहा वर्षांपूर्वी ‘बत्तासा’ या नावाने ओळख असलेली, विशेष मागणी असलेल्या शेवंतीची बंगळूर, गदग येथून मोठी आवक व्हायची.

त्यामुळे तेथील आवकेवर अवलंबून राहावे लागे. आता तशाच दिसणाऱ्या पांढरट पिवळ्या वाणाची लागवड पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये यवत, जुन्नर, सोरतापवाडी, सासवड, परिसर या परिसराचा समावेश आहे. त्यास दर देखील चांगला असतो.

आवक आणि दर

गुलछडीसाठी पुणे जिल्ह्यातील यवत, सोरतापवाडी, दौंड, बारामती भाग प्रसिद्ध आहे. गुलछडीच्या कंदाची लागवड झाल्यावर किमान दोन ते तीन वर्षे उत्पादन सुरू असते. गुहे पीकदुधाच्या रतीबासारखे असल्याने दैनंदिन आवक संतुलित असते. त्याची लागवड शेतकरी एक ते दोन एकर पेक्षा जास्त करीत नसल्याने आवक आणि दर टिकून असतात.

झेंडूला अन्य फुलांच्या तुलनेत दसरा आणि दिवाळीच्या लक्ष्मीपूजन, पाडव्याला मोठी मागणी असते. या दरम्यान नियमित होणाऱ्या आवकेबरोबर अन्य शहरांमधूनही अचानक आवक सुरू होते. यात प्रामुख्याने सोलापूर आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश असतो. त्यामुळे होणाऱ्या आवकेनुसार प्रत्येक तासाला झेंडूचे दर बदलत असतात. या वर्षी पावसाने फुलांचे मोठे नुकसान झाल्याने दसरा आणि दिवाळीमधील आवकेमध्ये ५० टक्के फुले भिजलेली, डागी तर ५० टक्के फुलेच चांगली होती. भिजलेल्या फुलांना किलोला १० ते ३० रुपये, तर चांगल्या फुलांना ५० ते ८० रुपये दर मिळाले.

Flower Market
Crop Insurance : चार हजारांवर शेतकरी अग्रिम पीकविम्याच्या प्रतिक्षेत

फूल महोत्सवाची संकल्पना

दरवर्षी सणासुदीला फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक होऊन बाजार समितीच्या मुख्य शिवनेरी रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. यामुळे फुलांची वाहने बाजार आवारात येण्यास विलंब होतो. त्यामुळे फुले गरम होऊन त्यांचा दर्जा खालावतो. पुणे, पिंपरी- चिंचवड शहर आणि उपनगरांसह अन्य शहरांतील खरेदीदारांना वेळेत फुले खरेदी करून पुन्हा विक्रीसाठी देखील विलंब होतो.

यामुळे ही समस्या कमी करण्याचा प्रयत्न झाला. आवक-जावक खरेदी- विक्रीत सुसूत्रता आणण्यासाठी मोठ्या वाहनांच्या (उदा. ट्रक) पार्किंगमध्ये फूल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. एकाच ठिकाणी घाऊक विक्री होऊन ही वाहतूक कोंडी टाळता आली. खरेदीदारांना सुलभपणे वेळेत आपापल्या ठिकाणी विक्रीसाठी जाणे शक्य झाले असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी सांगितले.

आम्ही चार ते पाच शेतकरी एकत्र येऊन १० ते १२ वर्षांपासून झेंडूची शेती करतो. श्रावण ते दिवाळीपर्यंत फुलांचे उत्पादन आणि पुरवठा होण्याच्या दृष्टीने नियोजन असते. यावर्षी आठ एकरांवर लागवड केली. गणपती उत्सवात किलोला ५० ते ७०, दसऱ्याला ६० ते ७० आणि दिवाळीत ३० ते ४० रुपये दर मिळाला. झेंडूसह शेवंतीचीही तीन वर्षांपासून सामूहिक लागवड करीत आहोत.

दीपक तरटे ९५१८५५५६३९

वाई, जि. सातारा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com