Libya Flood : लीबियामध्ये दोन हजारांवर पूरबळी

Floods in Libya : मध्यसमुद्रात आलेल्या डेनियनल वादळामुळे लीबियामध्ये पूर आल्याची घटना घडली. या नैसर्गिक संकटात ५ हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे.
Libya Flood
Libya FloodAgrowon

Flood Situation in Libya : लीबियामध्ये पुरात वाहून गेल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दोन हजारांवर गेली आहे. मृतांची संख्या पाच हजारांच्या आसपास असू शकते, असा अंदाज सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

‘डॅनिएल’ या वादळामुळे सोमवारी (ता. ११) रात्री लीबियाच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर नद्यांना पूर आला होता. पाण्याचा जोर वाढून दोन धरणे फुटल्याने किनारपट्टीवरील डेर्ना या गावात पाण्याचा प्रचंड लोंढा शिरला. यात शेकडो जण वाहून गेले. पाणी समुद्रात निघून गेल्यानंतर गावातील चिखलातून मंगळवारपर्यंत (ता. १२) सातशे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. बुधवारी मृतांची संख्या दोन हजारांवर गेली आहे. अनेक मृतदेह समुद्रात वाहून गेले असण्याची शक्यता असल्याने मृतांची संख्या पाच हजारांवर जाण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या नैसर्गिक आपत्तीमुळे तीस हजारांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.

Libya Flood
Maharashtra Rain : विदर्भ, मराठवाडा, खानदेशात विजांसह पावसाचा इशारा

अनेक वर्षांच्या अराजकतेमुळे पूर्व लीबियामध्ये नियोजनशून्य कारभार असून त्यामुळे हानीमध्ये भर पडत असल्याची टीका स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. धरणे फुटल्यामुळे अत्यंत वेगाने पाणी वाहिल्याने अनेक घरांचे, पुलांचे आणि रस्त्यांचे नुकसान झाले आहे. या गावातील नुकसान इतके प्रचंड आहे की बचाव पथकांना तेथे मदत करणेही शक्य नाही, असे काही संस्थांनी सांगितले आहे. डेर्ना शहराला जोडणाऱ्या सात प्रमुख रस्त्यांपैकी पाच रस्ते पूर्णपणे वाहून गेल्याने आणि नदीवरील पुलही कोसळल्याने या शहरात मदत पोहोचविण्यात प्रचंड अडथळे येत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com