Sangli News : कृष्णा आणि वारणा नदीच्या पुराने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्वप्नच पाण्यात वाहून गेले आहे. ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस या चार तालुक्यातील तब्बल ११ हजार ७५७ शेतकऱ्यांचे चार हजार ९७१ हेक्टरवरील बागायती आणि फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून नुकसानीच्या पंचनामे सुरु केले आहेत..जिल्ह्यात मे २०२५ पासून सतत पाऊस सुरू आहे. जूनमध्ये अखंडित १५ दिवस पाऊस चालू झाल्यामुळे खरीप पेरण्या करण्यातही अडचणी आल्या होत्या. तरीही उघडीप मिळालेल्या कालावधीत शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या. ऑगस्ट महिन्यात संततधार पाऊस सुरू झाल्यामुळे वारणा आणि कोयना धरणातून विसर्ग सुरू केला. कृष्णा आणि वारणा नद्यांना मागील आठवड्यात पूर आला. .Urad Crop Damage: पावसाने उडदाची हानी, पीक काढणीवर.या पुराचे पाणी जवळपास आठ ते दहा दिवस पिकात थांबले होते. अतिवृष्टीही सुरु होती. अतिवृष्टी आणि पुरामुळे मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस या चार तालुक्यातील १११ गावातील चार हजार ९७१ हेक्टरवरील भात, सोयाबीन, भुईमूग, ऊस, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे..पिकांचे पंचनामे सुरूपालकमंत्री आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी चार ते पाच दिवसांपूर्वी पूरग्रस्त भागाला भेट दिली. तेथील परिस्थितीची पाहणी केली. या दरम्यान, पिकांचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या पथकांनी थेट शिवारात जाऊन पिकांचे पंचनामे सुरु केले आहेत..Rain Crop Damage : पावसाचा २९ हजार हेक्टरला फटका .शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेपुराने कृष्णा आणि वारणा नदीच्या सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. ऊस, सोयाबीन, भात, द्राक्षे आणि इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिके घेतली होती, पण पुराने सर्व आशा पाण्यात बुडवल्या. ‘सर्व काही वाहून गेले, आता पुढे काय करायचे?’, अशी हताश भावना शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे..तालुकानिहाय नजर अंदाजे पिकांचे झालेले नुकसानतालुका शेतकरीसंख्या गावांचीसंख्या क्षेत्र(हेक्टरमध्ये)मिरज २९०० २२ १९६२.९वाळवा ३६३५ ३९ १२७९शिराळा २३२२ २८ ५७०पलूस २९०० २२ ११६०एकूण ११७५७ १११ ४७९१.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.