Flag Day Fund : पाच कोटी आठ लाखांच्या ध्वजदिन निधीचे अहिल्यानगरला संकलन

Fund Collection : अहिल्यानगर जिल्ह्याने १ कोटी ८४ लाख ९८ हजार उद्दिष्ट असताना ५ कोटी ८ लाख ६८ हजार ३०८ एवढ्या निधीचे संकलन केले.
Flag Day
Flag DayAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात उद्दिष्ठांच्या चार पट संकलन करत अहिल्यानगर जिल्ह्याने ध्वजदिन निधी संकलनात राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याने १ कोटी ८४ लाख ९८ हजार उद्दिष्ट असताना ५ कोटी ८ लाख ६८ हजार ३०८ एवढ्या निधीचे संकलन केले.

नागपूर जिल्हा दुसऱ्यास्थानी असून १ कोटी ९१ लाख ९८ हजार उद्दिष्ट असताना ३ कोटी ९ लाख ७७ हजाराचा निधी संकलित केला आहे. उद्दिष्ठापेक्षा अधिक निधी संकलित करणाऱ्या जिल्ह्याचा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

Flag Day
Ground Water Storage : रत्नागिरीत भूजल पातळीत वाढ झाल्याने दिलासा

भारतीय सैन्यदल हे आपल्या देशाचा अभिमान असून देशाच्या संरक्षणाबरोबरच नैसर्गिक आपत्तींच्या काळातही आपले सैन्यदल अत्यंत अमूल्य सेवा बजावते. भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले अशा जवानांच्या कुटुंबीयांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी, युद्धात अपंगत्व तसेच सेवा निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाकरिता सशस्त्र सेना ध्वज निधी संकलीत केला जातो.

अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सहकारी संस्था, धार्मीक संस्था, कृषी विद्यापीठ, राज्य परिवहन महामंडळ आणि नागरिकांनी ५ कोटींहून अधिक ध्वजदिन निधी संकलन करण्यात भरीव योगदान दिले. यात शिर्डी साई संस्थान, जिल्हा परिषद, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, महानगरपालिका, नगरपालिका आणि पोलिस विभागाने सर्वाधिक योगदान आहे.

Flag Day
Solapur DCC Bank : मागे हटणार नाही, शेतकऱ्यांचा पैसा येईपर्यंत लढणार

अहिल्यानगर जिल्ह्याने ध्वजदिन निधीचे विक्रमी संकलन करत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी केल्याने राजभवन येथे आयोजित सेना दिवस कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन जिल्ह्याचा सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या वतीने जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लिडर वि. ल. कोरडे (निवृत्त) यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

विक्रमी निधी संकलित करणारे जिल्हे

अहिल्यानगर ५ कोटी ८ लाख ६८ हजार ३०८

नागपूर ३ कोटी ९ लाख ७७ हजार

लातूर ९७ लाख

अमरावती १ कोटी ३८ लाख ८० हजार

कोल्हापूर २ कोटी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com