
Sindhudurg News : सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती (Sindhudurg Market Committee Election) समितीच्या पाच जागांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. दोन जागांसाठी नामनिर्देशनच दाखल झालेली नाहीत, त्यामुळे आता ११ जागांसाठी २४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून २० एप्रिलपर्यंत अर्ज माघारीसाठी मुदत आहे. त्यामुळे त्याच दिवशी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २८ एप्रिलला होणार आहे. या समितीच्या १८ जागांसाठी २९ नामनिर्देशनपत्र दाखल झाली होती. संस्था मतदार संघातील दोन महिला संचालकपदांसाठी श्रद्धा सावंत आणि सुजाता देसाई यांचे अर्ज प्राप्त झाले तर विमुक्त जाती भटक्या जमाती या जागेसाठी सूर्यकांत बोडके यांचा एकच अर्ज आला.
याशिवाय ग्रामपंचायत सदस्य मतदार संघातील आर्थिक दुर्बल घटक एका जागेसाठी संतोष राऊळ, तर व्यापारी व अडते मतदार संघाच्या दोन जागा असून त्यातील एका जागेसाठी मंगेश ब्रह्मदंडे यांचा अर्ज आला.
त्यामुळे या पाच जणांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. हमाल व तोलारी मतदार संघातून एकही अर्ज प्राप्त झालेला नाही तर व्यापारी व अडते मतदारसंघाच्या दोन जागा असून एकच अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे एकूण दोन जागांसाठी अर्जच प्राप्त झालेला नाही.
त्यामुळे १८ पैकी ११ जागांसाठी आता २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. २० एप्रिलपर्यंत अर्ज माघार घेण्यासाठी मुदत आहे. त्याच दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
बाजार समितीसाठी एकूण ६ हजार ४५७ मतदार निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये संस्था मतदार २ हजार ७४७, ग्रामपंचायत सदस्य मतदार ३ हजार ६८५, तर हमाल व तोलारी मतदार २५ मतदारांचा समावेश आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.