
अॅग्रोवन वृत्तसेवा
Ahilyanagar News : अहिल्यानगर ः महावितरणने वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या थकित वीजबिल ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर केली असून अभय योजना २०२४ नुसार थकबाकी एकरकमी भरल्यास थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकारात सूट देण्यात येणार असून अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण ३ हजार २८५ वीज ग्राहकांनी ४ कोटी ९६ लाख रुपयांचा भरणा करून थकबाकीतून मुक्ती मिळविली.
हे ग्राहक नवीन वीज जोडणी मिळण्यासाठी पात्र झाले आहेत. अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत थकबाकी भरून घेता येणार असल्याने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या अहिल्यानगर मंडळाकडून करण्यात आले आहे.
अहिल्यानगर मंडळाकडून दिलेल्या माहितीनुसार ३१ मार्च २०२४ पर्यंत थकित बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या (पीडी) घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे. थकित बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही.
या योजनेत वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकित बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरूपातील दंड माफ करण्यात येणार आहे. वीजबिलाचा वाद न्याय प्रविष्ट असलेल्या पीडी ग्राहकांनाही या योजनेचा काही अटी व शर्तीवर लाभ घेता येईल. मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून ऊर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यांत भरायची सवलत ग्राहकांना मिळेल. जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एक रकमी थकित बिल भरतील त्यांना दहा टक्के सवलत देण्यात येईल.
उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत मिळेल. संबंधित वीज ग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणच्या मोबाइल ॲपवरून योजनेचा लाभ घेता येईल. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज जोडणी घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा असेल. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. तथापि, थेट कायदेशीर कारवाई करण्याऐवजी सुविधा म्हणून ही सवलतीची योजना लागू केली असून ३१ मार्चपर्यंत या योजनेत सहभागी होता येणार आहे.
थकबाकीमुक्त झालेले ग्राहक (कंसात) भरणा केलेली रक्कम
अहिल्यानगर ग्रामीण ६७२ (३६ लाख ०२ हजार)
अहिल्यानगर शहर ६४१ (७६ लाख २६ हजार)
कर्जत ६६१ (४९ लाख ६१ हजार)
संगमनेर ५९४ (६५ लाख ४७ हजार)
श्रीरामपूर ७०७ (४५ लाख ३३ हजार)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.