Ravi Bhavan : रविभवनातील पाच कॉटेज, १२ सूटवर २८ लाखांवर खर्च

Nagpur News : हिवाळी अधिवेशन काळात रविभवन येथील पाच मंत्री कॉटेज व १२ सूटच्या देखभाल दुरुस्तीवर २८ लाखांवर खर्च करण्यात आला.
Ravi Bhavan
Ravi BhavanAgrowon

Nagpur News : हिवाळी अधिवेशन काळात रविभवन येथील पाच मंत्री कॉटेज व १२ सूटच्या देखभाल दुरुस्तीवर २८ लाखांवर खर्च करण्यात आला. वर्षभर पाहुण्यांची वर्दळ नसतानाही एवढी मोठी रक्कम खर्च करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हिवाळी अधिवेशन डिसेंबर २०२२ मध्ये झाले. दोन वर्षांनंतर हे अधिवेशन झाले. त्यापूर्वीचे अधिवेशन ऐनवेळी मुंबईला घेण्यात आले. त्यासाठी कोरोनाचे कारण पुढे करण्यात आले होते. २०२२ च्या अधिवेशनातून प्रत्यक्ष विदर्भ व महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले, हा चर्चेचा भाग आहे.

परंतु या अधिवेशनासाठी शेकडो कोटी खर्च झाल्याचे निदर्शनास येत आहे. बांधकाम विभागाकडून ९५ कोटींच्या खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला होता. कंत्राटदारांकडून कमी दराच्या निविदा सादर केल्याने ६५ कोटींच्या वर खर्च झाल्याची माहिती आहे. बांधकाम विभागाचा आराखडा आणि कामावर करण्यात आलेला खर्च वादात सापडण्याची शक्यता आहे.

Ravi Bhavan
Agriculture Department : शेतकरी कंपनीच्या नावाखाली नागपूर जिल्ह्यात वसुली

तरतूद आणि कामात तफावत

प्रत्यक्षात विभागाकडून तयार करण्यात आलेले तरतूद आणि कंत्राटदारांकडून करून घेण्यात आलेले काम यात बरीच तफावत आहे. यातील काही कामांवर लक्ष दिल्यावर अनेकांच्या भुवयाच उंचावल्या. रविभवन येथील ५ मंत्री कॉटेजच्या देखभाल दुरुस्तीवर १५ लाख ६१ हजार, तर १२ सुटच्या देखभाल दुरुस्तीवर १२ लाख ६६ हजार रुपये खर्च करण्यात आले.

आयुक्त कार्यालय व प्रशासकीय इमारत १ व २ येथील पाणी टाकी परिसरातील सफाई व इतर किरकोळ कामांवर १० लाख १० हजार रुपये खर्च करण्यात आल्याचे सुदर्शन गोडघाटे यांना माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीतून पुढे आले.

असा आहे खर्च

रविभवनमधील १२ सूट दुरुस्ती

तरतूद - २० लाख ७५ हजार १३८ रुपये

३८.९९ टक्के खालील निविदा प्रत्यक्ष खर्च १२ लाख ६६ हजार ०४१

सफाई, दुरुस्ती, रंगरंगोटीची कामे

तरतूद - १६ लाख ८७ हजार ३९४ रुपये

४०. ११ टक्के खालील निविदा प्रत्यक्ष खर्च १० लाख १० हजार ५८०रुपये

५ मंत्री कॉटेज दुरुस्ती

तरतूद - २४ लाख ५८ हजार ८२० रुपये

३६.५१ टक्के खालील निविदा प्रत्यक्ष खर्च १५ लाख ६१ हजार १०४ रुपये

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com