Protest by fishermen
Protest by fishermenAgrowon

Vadhvan Port : ‘वाढवण’विरोधात पुन्हा एल्गार

Fishermen Protest : पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांचा वाढवण बंदराला विरोध आहे. हे बंदराचे काम कायमस्वरूपी थांबवण्यासाठी गेल्या वर्षी आझाद मैदानावर मच्छीमारांनी आक्रोश मोर्चा काढला होता. त्या वेळी मच्छीमारांसोबत बैठक घेतली जाईल, असे आश्‍वासन देण्यात आले होते.

Palghar News : पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांचा वाढवण बंदराला विरोध आहे. हे बंदराचे काम कायमस्वरूपी थांबवण्यासाठी गेल्या वर्षी आझाद मैदानावर मच्छीमारांनी आक्रोश मोर्चा काढला होता. त्या वेळी मच्छीमारांसोबत बैठक घेतली जाईल, असे आश्‍वासन देण्यात आले होते.

मात्र त्यानंतरही बैठक झाली नसल्याने आज (ता. २१) जागतिक मच्छीमार दिनी समुद्रकिनाऱ्यावर हा दिवस साजरा करण्याऐवजी सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होत आहे, असे प्रतिपादन नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे अध्यक्ष लिओ कोलासो यांनी केले.

नॅशनल फिश वर्कर्स फोरम, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघ, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सरकारचा निषेध करण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी (ता. २१) मच्छीमार दिन साजरा करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर लिओ कोलासो बोलत होते.

Protest by fishermen
Jayakwadi Water Issue : समन्यायी पाणीवाटप शासनास बंधनकारकच

या आंदोलनावेळी व्यासपीठावर कुंडीतील तिवराच्या झाडाची पूजा मच्छीमार महिला व मासेमार बांधवांनी केली. वास्तविक हा कार्यक्रम समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या थाटामध्ये साजरा होतो. मात्र वाढवण बंदरासारखे प्रकल्प व अन्य मागण्यांप्रकरणी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा कार्यक्रम साधेपणाने करावा लागत आहेत. मच्छीमारांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

वाढवण बंदर कायमचे रद्द करण्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गेल्या वर्षी २१ नोव्हेंबर २०२२ रोजी मच्छीमार दिनी आझाद मैदानावर मच्छीमारांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री यांनी मच्छीमारांबरोबर बैठक घेतली जाईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र वर्षभरात बैठक घेतली नाही. याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केल्याचे मच्छीमार नेते लिओ कोलासो यांनी सांगितले.

Protest by fishermen
Watar Issue : पाणीप्रश्‍नावर मराठवाडा बहुजन विकास आघाडीचा बैठा सत्याग्रह

जनसुनावणी रोखण्याचा इशारा

वाढवणविषयी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून २२ डिसेंबर रोजी जनसुनावणी आयोजित केली आहे, मात्र ही जनसुनावणी होऊ देणार नाही. पालघर, मुंबईतील मच्छीमार जनसुनावणीच्या ठिकाणी येऊन हा कार्यक्रम हाणून पाडणार आहोत, असा इशारा देण्यात आला.

रस्त्यावर उतरण्याचा निर्णय

मुंबईपासून ते गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत वाढवण बंदराचा परिणाम लोकांना भोगावा लागणार आहे. अनेक लोकप्रतिनिधी बंदर होऊ देणार नाही, म्हणून व्यासपीठावर भाषणे ठोकून गेले; मात्र त्यांनीही मच्छीमारांना दगा दिला. लोकनेत्यांवर आता आमचा विश्वास नाही, आता आम्हालाच रस्त्यावर उतरावे लागेल, असे मच्छीमार नेत्यांकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com