Fishing Community: ‘मासळीचा दुष्काळ सरू दे, दर्याचे धन माझ्या होरीला येऊ दे,’ अशी आर्त विनवणी करीत मच्छीमारांनी बुधवारी (ता. २६) नारळी पौर्णिमेनिमित्त दर्याराजाला मानाचा नारळ अर्पण केला. कोकणातील लोकजीवनात महत्त्वाचे स्थान असलेला हा सण रायगडच्या किनारपट्टीवर पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. .पालनपोषणाची मदार समुद्रावर असल्याने दर्याराजाने वर्षभर कृपादृष्टी ठेवावी, भरपूर मासळी मिळावी आणि मासेमारीचा हंगाम सुखरूप जावा, अशी प्रार्थना मच्छीमारांनी केली..Agriculture Success Story: संघर्षातून फुलशेतीचा ध्यास, मजुरीचा थांबला प्रवास.नारळी पौर्णिमेनिमित्त नव्या नौकेचे पूजन करून ती समुद्रात सोडण्याची प्रथा आहे. त्यानुसार बोडणी आणि वरसोली येथे नव्याने सजवलेल्या नौकांचे विधिवत जलावतरण करण्यात आले..Fishing Season: परराज्यांतील मच्छीमारांची नोंद.गेल्या काही वर्षांपासून सातत्याने जाणवत असलेला मत्स्यदुष्काळ दूर व्हावा आणि यंदाच्या हंगामात मुबलक मासळी मिळावी, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली. नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर गेल्या १० दिवसांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी नारळफोडीच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते..बुधवारी सकाळपासून पारंपरिक वेशभूषेतील मच्छीमार, महिलांची लगबग आणि ढोल-ताशांच्या गजराने कोळीवाडे दुमदुमून गेले. सजवलेल्या पालखीतून मानाचा नारळ समुद्रकिनारी आणण्यात आला. विधिवत पूजा करून हा नारळ दर्याराजाला अर्पण करण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.