Kisan Drone Update
Kisan Drone UpdateAgrowon

Kisan Drone Update : नगर जिल्ह्यातील पहिले किसान ड्रोन राणेगावात

Agriculture spraying : बळीराजाला शेती व्यवसायात कीटकनाशक फवारणी, जमिनीच्या नोंदींचे दस्तऐवजीकरण, भाजीपाला, फळे शेतातून थेट बाजारपेठेत घेऊ जाण्यासाठी तसेच कमी वेळेत शेतीची कामे पूर्ण व्हवीत.
Published on

Nagar Kisan Drone News : बळीराजाला शेती व्यवसायात कीटकनाशक फवारणी, जमिनीच्या नोंदींचे दस्तऐवजीकरण, भाजीपाला, फळे शेतातून थेट बाजारपेठेत घेऊ जाण्यासाठी तसेच कमी वेळेत शेतीची कामे पूर्ण व्हवीत.

याकरिता केंद्र सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून किसान ड्रोनची योजना अमलात आणली. या योजनेचा प्रथम लाभ जिल्ह्यातील राणेगाव (ता. शेवगाव) येथील कृषीपदवीधर शेतकऱ्याने मिळवला आहे.

या ड्रोनची किंमत दहा लाख रुपये असून यासाठी पाच लाखांचे आनुदान दिले जाते. ड्रोनला लावण्यात आलेल्या कीटकनाशक साठवणीच्या एका टाकीतून एक एकरचे शेत अवघ्या दहा मिनिटात फवारले जाणार असून त्यासाठी शेतकऱ्यांकडून एकरी ३०० ते ५०० रुपये आकारले जाणार आहेत.

Kisan Drone Update
Kisan Drone News : दहा पिकांसाठी ड्रोनद्वारे फवारणी कार्यपद्धती निश्‍चित

ड्रोनच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या कीटकनाशक खर्चात ३० टक्के तर पाणी वापरात ९० टक्के बचत होणार आहे. कमी मजुरीत जलद फवारणी साध्य होणार आहे. देशात २ किलोपासून ते १५० किलो वजनाचे ड्रोन उपलब्ध असून राज्यात मात्र सर्वसाधारणपणे २५ किलो वजनाचे ड्रोन शेतीकामासाठी स्वीकारले जात आहे.

ड्रोन कृती आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात ३८ ड्रोन देण्यात आले असून २५ ठिकाणी ड्रोनयुक्त सेवा सुविधा केंद्रे उघडली जात आहेत. अनुदानासाठी कृषी विभागाने सोडत काढून नावे निश्चित केली आहेत.

यामध्ये जिल्ह्यातील राणेगाव येथील विवेक आपटे तसेच शेवगाव येथील जगदंबा महिला ग्राहक सहकारी संस्थेची किसान ड्रोनसाठी निवड झाली आहे. तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले यांनी पाहणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com