Forest Fire In Thane : शिकारीसाठी ठाण्यात डोंगरांना आग

वज्रेश्वरी तालुक्यातील ग्रामीण भागात शिकार आणि वन जमिनीवर अतिक्रमण करण्यासाठी डोंगरांना आग लावण्यात येत आहे.
Forest Fire
Forest FireAgrowon

Thane News : वज्रेश्वरी तालुक्यातील ग्रामीण भागात (Rural Area) शिकार आणि वन जमिनीवर अतिक्रमण करण्यासाठी डोंगरांना आग (Mount Fire) लावण्यात येत आहे. गणेशपुरी, उसगाव परिसरात दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी लागलेल्या आगीत शेकडो एकर वनसंपदा जळून खाक झाली.

या आगीच्या घटना रोखण्यासाठी वन विभागाला (Forest Department) अपयश आले असून नागरिकांमध्ये जागृती केल्यास या घटना कमी होण्यास मदत होईल, असे मत पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

ठाणे जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील जंगले, वनसंपदा जळून कोट्यवधी रुपयांची वनसंपदा नष्ट झाली आहे. भिवंडी तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागात नैसर्गिक विविधतेने नटलेले डोंगर, टेकड्या आहेत. त्यामुळे या भागात जंगली प्राण्यांचाही वावर आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या गणेशपुरी, वज्रेश्वरी, तानसा नदी खोऱ्यातील काही टेकडी गावालगत असल्याने तिथे अतिक्रमण करण्यासाठी प्लांट मिळावा म्हणून येथील भागात आगी लावून जंगल नष्ट करण्यात येते;

तर अनेकदा सशाची शिकार मिळावी, म्हणून आगी लावण्यात येतात. उसगाव, गणेशपुरी, वज्रेश्वरी, उसगाव बंधारा, पारिवली, कपरीचे पाणी व दुगाड आदी वनक्षेत्रामध्ये उत्खनन, वृक्षतोड, टेकड्या खोदाई, तसेच डोंगरांना आगी लावल्या जात आहेत.

Forest Fire
Forest Land : जमीन तेवढीच, लोकसंख्या वाढली...

मांडवी व गणेशपुरी वन परिक्षेत्र परिसरात गेल्या एका महिन्यांत पाच ते सहा डोंगरांना वणवे लागले आहेत. त्यामुळे हजारो हेक्टर वनसंपदा नष्ट झाली आहे; मात्र एकाही डोंगराला लागलेली आग विझवण्यासाठी वन विभागामार्फत कोणतेही पाऊल उचलले गेले नाही.

तालुक्याच्या ग्रामीण पट्ट्यातील घोटगाव, उसगाव, दुगाड, वज्रेश्वरी परिसरातील डोंगरांना आगी लागून हजारो हेक्टरवरील वनसंपदा जाळूनखाक झाली आहे.

सर्वसामान्यांना विश्वासात घेणे आवश्यक

सर्वसामान्य जनता आणि प्रशासन यांच्यात नेहमीच अंतर असते. त्यात वनविभाग म्हटले की सर्वसामान्य चार हात लांबच राहतात. त्यामुळे भविष्यात जंगलातील आगी रोखण्यासाठी विभागाने स्थानिक जनतेलाही विश्वासात घेत आग लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

वनविभागाने सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेत जनजागृती करावी. जी झाडे आहेत, त्यांचे अगोदर संवर्धन व संगोपन करणे काळाची गरज आहे.
दीपक पुजारी, निसर्गप्रेमी, अभ्यासक, गणेशपुरी
आग लावण्यात येणाऱ्यांची गुप्त माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. तसेच गावागावात गुराखी, ग्रामस्थ यांच्याशी चर्चा, विचारविनिमय करून उपाययोजना करण्यात येत आहे.
राकेश शेलार, वनक्षेत्रपाल, गणेशपुरी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com