Maharashtra Budget 2023: अर्थमंत्री फडवणीसांनी गोड बोलून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली...

कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचीच आमची भूमिका आहे असे सांगत यावर्षी अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत केली जाईल, असे कोरडे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले.
DCM Devendra Fadnavi
DCM Devendra FadnaviAgrowon
Published on
Updated on

Devendra Fadnvis- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प (maharashtra Budget 2023) सादर करताना सुरूवातच शेती आणि शेतकऱ्यांपासून केली.

``एक बीज पेरलं की त्यातून असंख्य कणसं तयार होतात. आज मात्र हवामानबदल, अवकाळी आणि अवर्षण अशा असंख्य समस्यांनी अन्नदाता ग्रासला आहे. शाश्वत शेतीसाठी अनेक उपाय होत असले तरी त्याला हक्काच्या मदतीची हमी आवश्यक आहे...``असे फडणवीस म्हणाले.

परंतु त्यासंदर्भात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणतीही ठोस घोषणा मात्र त्यांनी केली.

तापमान वाढ व वातावरणातील बदलाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही योजना, कार्यक्रम, निधी जाहीर करण्यात आलेला नाही.

तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही अर्थमंत्र्यांनी वेळ मारून नेली.

कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचीच आमची भूमिका आहे असे सांगत यावर्षी अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत केली जाईल, असे कोरडे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले.

या शेतकऱ्यांना नेमकी किती मदत दिली जाणार, याबद्दल त्यांनी चुप्पी साधली.

एकंदर अर्थमंत्र्यांनी केवळ गोड बोलून आमच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात तीन वर्षांत २५ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे उद्दीष्ट अर्थमंत्र्यांनी जाहीर केले.

त्यासाठी तीन वर्षांत एक हजार कोटी रूपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. राज्यात एक हजार जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करू, पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाची व्याप्ती वाढवू, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

देशी गोवंश संवर्धन, संगोपन, संरक्षणासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.

DCM Devendra Fadnavi
Maharashtra Budget 2023 : केंद्रा पाठोपाठ राज्य सरकारच्या नैसर्गिक शेतीसाठी विशेष तरतुदी

आयोगामार्फत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना, गोमय मूल्यवर्धन योजना राबविली जाणार आहे.

राज्यात गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा लागू केल्यानंतर गायींची संख्या वाढण्याऐवजी घटली आहे. तसेच मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे.

सरकार गायींच्या संवर्धनाऐवजी भाजप आणि संघ परिवाराचा राजकीय अजेंडा राबविण्यात मश्गुल असल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे तज्ज्ञ सांगतात. गोसेवा आयोगाच्या माध्यमातून हाच राजकीय अजेंडा राबविण्याला आणखी चालना दिली जाईल, अशी अटकळ बांधली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com