
Jalna News : मस्साजोगचे (ता. केज) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या. वाल्मीक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करा. परभणीत पोलिस कोठडीत मारहाण झालेल्या स्व. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी मारहाण करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा,
यासह इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजाच्या वतीने जालन्यात शुक्रवारी (ता. १०) महाजन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या वेळी मंत्री धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यासह प्रतिमोर्चे काढणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावरही टीका करण्यात आली.
या मोर्चात सहभागी झालेले मनोज जरांगे पाटील म्हणाले, की आरोपींना वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके जातीय रंग देऊन प्रति मोर्चे काढत आहेत. सत्तेत बसणारे मंत्री हे एका जातीचे नसतात, त्यामुळे आंदोलन करणाऱ्या मंत्र्यांना बोलणार. धनंजय देशमुख यांना धमकी दिल्यानंतर आपण धनंजय मुंढे यांना रस्ता फिरू देणार नाही, असे म्हणालो.
धनंजय मुंडे यांचे देखील परळीपासून मुंबईपर्यंत काय काय धंदे सुरू आहेत, हे आम्हालाही माहिती आहे. त्यामुळेच धनंजय मुंढे यांनी षड्यंत्र रचून ओबीसी नेत्यांना प्रति मोर्चा काढण्यास सांगितले असून, आरोपींना वाचविण्यासाठी मोर्चे काढण्याची यामुळे प्रथा पडेल.
या वेळी दलित पॅंथरचे दीपक केदार म्हणाले, की हा पाचवा मोर्चा असून संतोष दोशमुख यांची हत्या होऊन महिना झाला तरी आरोपी सापडत नाहीत. २५ दिवस झाले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला तर त्या पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही. दुसरीकडे लक्ष्मण हाके एका जातीच्या आरोपीला वाचवण्यासाठी आटापिटा करत आहेत. परभणीत भीमसैनिकांनी त्यांचा माइक हिसकावला. आता पुन्हा प्रतिमोर्चे काढले तर अडवे करू, असा इशारा त्यांनी दिला.
देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्यानंतर पंकजा मुंडे त्यांच्यासमवेत का गेल्या नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. वाल्मीक कराडसह इतर सर्व संशयित आरोपींची संपती जप्त करावी, अशी मागणी केदार यांनी केली. सरकारने या दोन्ही प्रकारणांत न्याय द्यावा, अन्यथा जनता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरेल, असे खासदार डॉ. कल्याण काळे या वेळी म्हणाले.
मनोज जरांगे पाटील आले नाहीत व्यासपीठावर
महाजनआक्रोश मोर्चात मनोज जरांगे पाटील सहभागी झाले होते. मात्र मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर श्री. जरांगे पाटील व्यासपीठावर आले नाहीत. ते सभेच्या ठिकाणी थेट जमिनीवर बसले. त्यांची प्रकृती ठिक नसल्याने ते व्यासपीठावर न आल्याचे सांगण्यात आले. मात्र व्यासपीठावर सर्व राजकीय पक्षांची नेते मंडळी असल्याने त्यांनी जाणे टाळल्याची चर्चा सुरू होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.