Sustainable Farming: अति उष्णतेमुळे अंजिराची पाने करपतात, पिवळी होऊन पानगळ वाढते. फळांवर सौरजळ होऊन गोलाकार तपकिरी चट्टे पडतात, फळे सुरकुततात, बाजारमूल्य घटते. दीर्घ दुष्काळानंतर अचानक पाऊस पडल्यास फळे तडकतात, दर्जा कमी होतो, बुरशीजन्य रोग वाढतात. जमिनीतील आर्द्रता घटल्याने मुळांची वाढ कमी होते, पोषकद्रव्यांचे शोषण घटते, फळधारणा कमी होते, फळांची वाढ खुंटते, साखरेचे प्रमाण कमी होते, टिकवण क्षमता कमी होते..उपाययोजनायोग्य बहराची निवड : पाण्याच्या उपलबद्धतेनुसार बहराची निवड करावी.सूक्ष्म सिंचन प्रणाली : मुळाजवळ नियंत्रित पाणीपुरवठा करता येतो, खते देणे सोपे होते, उत्पादनात वाढ होते..Fruit Orchard Protection: तीव्र उन्हापासून फळबागांचे संरक्षण करणे आवश्यक.आच्छादन : जमिनीचे तापमान नियंत्रित राहते, पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.कॅल्शिअम व पोटॅश फवारणी : फळ तडकणे कमी होते, फळांची मजबुती वाढते, साठवण क्षमता वाढते.सावली व्यवस्थापन : क्रॉप कवर / शेडनेटचा वापर केल्यास उष्णतेपासून संरक्षण होते, फळांचा दर्जा सुधारतो..Custard Apple Orchard Planning: हवामान बदलामध्ये सीताफळ बागेचे नियोजन.आंतर-पिके : जमिनीचे तापमान नियंत्रणात राहते, पाण्याची बचत होते तसेच तण नियंत्रणही होते.सेंद्रिय घटकांचा वापर : शेणखत, कंपोस्ट खत, जिवामृताचा वापर केल्याने जमिनीची पाणी धारण क्षमता वाढते, सूक्ष्मजीव सक्रियता वाढते पर्यायाने उत्पादन व दर्जा सुधारतो..- डॉ. प्रदीप दळवे ८९८३३१०१८५-डॉ. युवराज बालगुडे ९८९०३८०६५४(अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके (अंजीर आणि सीताफळ) संशोधन प्रकल्प, जाधववाडी, ता. पुरंदर जि. पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.