Local Body Elections: सोलापुरात ‘मिनी मंत्रालया’साठी प्रस्थापितांच्या प्रतिष्ठा पणाला
Rural Politics: गेल्या सात–आठ वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. जिल्हा परिषदेच्या ६८ जागांसाठी २७१, तर पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी ४८५ उमेदवार रिंगणात उतरल्याने ‘मिनी मंत्रालय’ ताब्यात घेण्यासाठी जोरदार धडपड सुरू आहे.