Nashik News: परिसरात राजगीऱ्याला ( राम दाणा) हवामान अनकूल मिळाले. यंदा पीक जोमदार वाढले आहे. पिकाचे उंची साधारणत पाच फूट पर्यंत वाढली. अनेक शेतकऱ्यांनी कांद्यामध्ये मिश्रपीक किंवा शेताच्या बांधाकडे लागवड केली आहे..घरापुरता वर्षभर टिकेल एवढाच पेरणी करतात. गहू किंवा कांद्यामध्ये मिश्र पीक म्हणून पेरतात. मुख्य पिका वर काही परिणाम होत नाही. खरिपात किंवा रब्बी हंगामात ही राजगिऱ्याची पेरणी करतात. कोरडवाहू जमिनीसाठी हे पीक वरदान ठरत आहे..Dryland Wheat: कमी पाणी असलेल्या भागात गव्हाचे उपयुक्त वाण कोणते?.तीन महिन्यात पीक तयार होते. तयार होणाऱ्या या पिकाची हिरवी पाने लाल होऊ लागली आहेत. काही भागात गुलाबी ,गर्द लाल असलेला राजगिरा दुरून येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधतो. कमी पाणी कमी खर्च यामुळे दुर्गम भागात आदिवासी बांधव विक्रीसाठी राजगिरा लावला आहे..Dryland Wheat: कोरडवाहू परिस्थितीत भरघोस उत्पादन देणारे गव्हाचे ५ वाण.उपवासाच्या दिवशी राजगिऱ्याच्या पदार्थांचा उपयोग केला जातो. त्या दिवशी तो पोटासाठी वरदान आहे. यापासून लाह्या करून लाडू ,चिक्की बनवतात. तसेच पिठापासून खीर ,धिरडी, उपमा, डोसे, गुडदाणी इत्यादी पदार्थही केले जातात..सध्या राजगिरा एक किलो १०० ते १२० रूपये आणि पिठ १४० ते १६० रुपये आहे. सरासरी चार ते पाच मोठ्या तुऱ्या पासून एक ते सव्वा किलो राजगिरा मिळतो. योग्य काळजी घेतल्यास एकरी आठ ते दहा क्विंटल उत्पन्न घेता येते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.