Khandesh Keli Khat Niyojan: खानदेशात मृग बहर केळी लागवड किंवा खरीप हंगामासाठी शेतांत सध्या पूर्वमशागत, मशागतीची कामे सुरू आहेत. अनेक शेतकऱ्यांना शेणखत न मिळाल्याने त्यांनी आपल्या केळीसाठी नियोजीत काळ्या कसदार क्षेत्रात शेणखताऐवजी पांढऱ्या, पाण्याचा निचरा करणाऱ्या मातीची भर घातली आहे. .काळ्या कसदार जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही. सततच्या पावसात या क्षेत्रात करपा व अन्य बुरशीजन्य रोग बळावतात. या क्षेत्रातील केळीसही पावसाळ्यात कमी उठाव असतो, असे मानतात. यामुळे काळ्या कसदार जमिनीत अनेक जण सध्या शेणखतासह पांढऱ्या मातीची भर घालत आहेत. शेणखत नसल्याने माती अधिकची टाकून घेतली जात आहे..Cow Dung Manure : खानदेशात शेणखत दुरापास्त.शेणखतासाठी शोधाशोधशेणखत आता दुरापास्त झाले आहे. त्याचे दरही वधारले आहेत. एक ट्रॉली शेणखत २८०० ते ३००० रुपयांना मिळत आहे. तेदेखील हवे तसे व हवे तेवढे मिळत नाही. मोठे केळी उत्पादक शेणखताची भर केळीसाठी शेतात घालून घेतात. शेणखत गावात न मिळाल्यास अन्य तालुके, अन्य गावांमधून मोठा वाहतूक खर्च करून आणावे लागत आहे. केळी पट्ट्यात शेणखताची मागणी आहे. खानदेशात धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील तळोदा, शहादा, जळगावातील चोपडा, यावल, जामनेर, रावेर, मुक्ताईनगर, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव या भागात शेणखताची मागणी वाढली आहे..Compost Making Tips: दर्जेदार कंपोस्ट मिळवण्यासाठी वापरा सोप्या टिप्स!.पुराचा फटका, पशुधनही कमीयंदा पावसात अनेक नदीकाठच्या गावांत जामनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, मुक्ताईनगर, बोदवड, पारोळा आदी भागात हानी झाली. शेणखत व्यवस्थित संकलित करता आले नाही. तसेच अलीकडे पशुधनाची संख्या कमी झाली आहे. यामुळे शेणखत हवे तेवढे नाही. मागणी अधिक आहे. यामुळे शेतकऱ्यांना यंदाही महाग शेणखत घ्यावे लागत आहे..केळीसाठी अधिक मागणीमृग बहर केळी पीक हिवाळ्यात निसवते व काढणीही हिवाळ्यानंतर सुरू होते. या केळीची लागवड मे ते जुलै या कालावधीत खानदेशात केली जाते. या केळीसाठी शेणखताची अधिक मागणी आहे. पुढे पावसाचे संकेत आहे. यामुळे शेतात शेणखत, माती टाकण्याचे काम या महिन्यात वेगात सुरू असून, हे काम आटोपून घेण्याची लगबग सुरू आहे. शेणखत टाकून लागलीच पूर्वमशागत व पुढे केळी लागवड अशी कार्यवाही केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.