Cloudy Weather : ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

Concerns of Farmers : परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
Cloudy Weather
Cloudy WeatherAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंतातूर झाले आहेत, तर चिकू बागायतदारांवर मोठे आर्थिक संकट कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हंगामी पिकामध्ये कडधान्य व भाजीपाला पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. २५ नोव्हेंबर रोजी झालेला अवकाळीतून जेमतेम सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच रविवार (ता. १७)पासून पुन्हा ढगाळ वातावरण, तसेच पावसाळासदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Cloudy Weather
Cloudy Weather : खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण

या परिसरात हंगामी भाजीपाल्याची लागवड करणारे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांनी वांगी, मिरची, कोबी, फ्लॉवर तसेच वेलवर्गीय भाज्यांची लागवड केली आहे. तसेच परिसरात चिकू व आंबा बागायती मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या आहेत.

Cloudy Weather
Cold Weather Update : विदर्भ, उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी

डिसेंबरमधील चिकूचा हंगाम सुरू, तर आंबा बागायतदार आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र आता ढगाळ वातावरण होत असल्याने उत्पादन घटण्याची भीती परिसरातील शेतकरी वर्गामध्ये आहे.

मेहनतीवर पाणी फेरण्याची भीती

अनेक बागायतदारांनी आंब्याचे उत्पन्न चांगले मिळावे, म्हणून औषध फवारणी खते व बागायतीची मशागत करून हजार रुपये गुंतवणूक केली आहे. चिकू बागायतदारांची सहा महिन्यांनंतर हंगाम आल्यामुळे फळे काढून बाजारपेठेत पाठवण्यासाठी लगबग सुरू आहे. परंतु निसर्गाने डोळे वटारल्यामुळे मेहनतीवर पाणी फेरते की काय, अशा प्रकारची भीती शेतकऱ्यांच्या मनात भरली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com