Jalgaon News: पावसाचा खंड आणि आता सततचा पाऊस यामुळे उडीद पिकाची हानी होईल, अशी स्थिती आहे. उडीद पीक काढणीला येताच पाऊसही सुरू झाला आहे. यामुळे पीक हाती येईल, की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. .उडीद पीक खानदेशात कमी होत आहे. कारण अनेकदा पेरणी पाऊस लांबल्यास उशिरा होते. तर काही वेळेस पेरणीनंतर पावसाचा खंड असतो. अनेकदा पीक काढणीला येताच पाऊस बरसू लागतो. यामुळे शेतकरी उडीद पीक कमी करीत आहेत. उडदाऐवजी मका, सोयाबीन पेरणीला अनेक जण पसंती देऊ लागले आहेत. .Urad Crop Damage : अतिपावसाचा उडीद पिकाला फटका.यंदा उदडाची पेरणी जळगाव जिल्ह्यात सुमारे १३ हजार हेक्टरवर झाली आहे. जळगावातील उडदाचे अपेक्षित क्षेत्र सुमारे १६ हजार हेक्टर एवढे आहे. पण पेरणी घटली आहे. खानदेशात एकूण २० हजार हेक्टरवर उडीद पीक आहे. पीकस्थिती यंदा हवी तशी नाही. कारण पावसाने दडी मारल्याने फुले गळून पडली होती. जेमतेम शेंगा लागल्या. त्यात काळ्या कसदार जमिनीत पीक तग धरून होते. पाऊस आल्याने पिकास दिलासा मिळाला. .शेंगा होताहेत पक्वअनेक भागात उडीद पिकात शेंगा पक्व होत आहेत. त्यांची काढणी, मळणी पुढील आठवड्यात करावी लागेल. पण मागील काही दिवसांपासून अनेक भागांत सतत पाऊस येत आहे. पाऊस सुरूच आहे. यातच पोळा सणाला पावसाचे पुनरागमन झाल्यास पाऊस थेट नवरात्रोत्सवापर्यंत येत असतो, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. यामुळे पाऊस सुरूच राहील व उडदाचे पीक हाती येईल की नाही, याची शंका आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. .Urad Crop Loss: कमी पावसामुळे जळगाव जिल्ह्यात उडीद पिकाला फटका.अनेक शेतकरी पीक जमिनीत गाडण्याच्या तयारीतअनेकांचे उडीद पीक पावसाचा खंड पडल्याने हातचे गेल्यात जमा आहे. शेंगा कमी आहेत. त्यात उत्पादन हवे तसे येणार नाही. यामुळे कापणी, मळणीचा खर्चही परवडणार नाही. यामुळे अनेक शेतकरी उडीद पिकाला शेंगांसह जमिनीत गाडण्याच्या तयारीत आहेत. यामुळे जमीन सुपीकतेला मदत होईल..त्यावर पुढे केळी, पपई किंवा अन्य रब्बी पिके जोमात येतील. पेरणीही पुढे वेळेत होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यात काही शेतकऱ्यांचे पीक पिवळे पडले आहे. त्यावर रोगराई आहे. यामुळे ही रोगराई जमिनीत जाईल व पुढील पिकांना, जमीन सुपीकतेला फटका बसेल, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे उडीद पीक शेतात एक मोठा खड्डा करून त्यात गाडण्याचे नियोजनही काही शेतकरी करीत आहेत..वाफसा स्थिती नाहीशीउडदाची पेरणी सर्वत्र कमी अधिक आहे. हलक्या, मध्यम जमिनीत उडीद पिकात कापणीचे काम करता येईल. पण काळ्या कसदार जमिनीत वाफसा नाही. यामुळे कापणीचे काम उरकणे शक्य नाही. त्यासाठी काही दिवस नीरभ्र वातावरण हवे आहे. पण पाऊस येतच आहे. अशात उडीद पीक कापणी व पुढे मळणी शक्य होईल की नाही, अशी शंका शेतकऱ्यांना आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.