Shaktipeeth Highway : 'घेरा डालो डेरा डालो' शक्तिपीठ विरोधात शेतकरी एकवटणार, उद्या विराट मोर्चाचे आयोजन

Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गा विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.
Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highwayagrowon
Published on
Updated on

Shaktipeeth Highway Kolhapur : गोवा ते नागपूर ८०५ किमीचा शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातून जाणार आहे. यामध्ये हजारो हेक्टर शेतजमीन जाणार असल्याने अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान हा महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापुरात मंगळवारी (दि. १८) जिल्हाधिकारी कार्यालयावर 'घेरा डालो डेरा डालो' या बॅनरखाली महामोर्चा काढण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चास अनेक पक्षाच्या नेत्यांनी पाठींबा दर्शवत हजारोंच्या संख्येने येण्याचे आवाहन केले आहे.

महामार्गविरोध समितीचे समन्वयक गिरीष फोंडे म्हणाले की, मोर्चाची सुरुवात दसरा चौकातून करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने दसरा चौकात सहभागी व्हावे, समाजातील कोणत्याही घटकाची मागणी नसताना करण्यात येत असलेल्या नागपूर ते गोवा हा ८०५ किलोमीटर लांबीच्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध कायम असणार आहे.

भूसंपादनास आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठविले आहे. हा महामार्ग रद्द व्हावा, यासाठी हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाची गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू आहे. त्याच्यासाठी शक्तिपीठ महामार्ग जात असलेल्या गावांमध्ये सभा, बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये महामार्गामुळे शेतकरी देशोधडीला लागणार असल्याचा आरोप करून हा महामार्ग रद्द करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील काही नेत्यांकडून 'शक्तिपीठ महामार्ग रद्द होणार आहे', 'रद्द करणारच', अशा घोषणा सोशल मीडियाद्वारे करण्यात येत आहेत. या घोषणांचे स्वागत आम्ही करत असलो तरी शक्तिपीठ महामार्गाबद्दल मुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्र्यांनी कोणतीच प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. त्यामुळे कोल्हापुरातील नेत्यांच्या अशा घोषणा व विधानांना जास्त महत्त्व देऊ नये असे गिरीष फोंडे म्हणाले.

Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्ग विरोधात महायुतीचे नेते एकवटले, मुख्यमंत्र्यांची दिलं निवेदन

मुख्यमंत्र्यांनी शक्तिपीठ रद्दची घोषणा करावी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्री यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात येत असल्याची घोषणा करणे आवश्यक आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाबद्दल जिल्ह्यातील नेत्यांच्या घोषणांकडे दुर्लक्ष करून मंगळवारच्या मोर्चाची तयारी करावी, असे शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com