Farmers Subsidy : शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचे पैसे मिळणार की नाही? आर्थिक वर्ष बदललं तरी प्रतीक्षा कायम

Maharashtra Farmers : राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली.
Farmers Subsidy
Farmers Subsidyagrowon

Maharashtra Farmers Subsidy : राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली. परंतु प्रोत्साहन अनुदानाच्या पहिल्या तीन यादीत समावेश न झालेले अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत.

शिवाय त्यात महिनाभरापूर्वी घोषणा केलेल्या एकाच वर्षात दोनवेळा कर्ज उचललेल्या शेतकऱ्यांचीही भर पडली आहे. आर्थिक वर्ष सरतानाही त्यांची प्रतीक्षा कायम राहिली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मार्च एंडचे गणित बिघडले आहे.

थकबाकीदार शेतकऱ्यांचे शासनाने कर्ज माफ केले. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांत अन्यायाची भावना निर्माण झाली. त्यांच्यासाठी शासनाने प्रोत्साहन अनुदान योजना आणली. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. पण, शासनाकडून सर्व शेतकऱ्यांना एकाच टप्प्यात अनुदान दिले नाही.

Farmers Subsidy
Maharashtra Rain : राज्यात आजही उष्णता वाढ, पावसाचा अंदाज; राज्याच्या बहुतांशी भागात तापमान वाढीचा अंदाज

दरम्यान, एकाच वर्षात दोनवेळा कर्ज उचल केलेल्या शेतकऱ्यांना वगळले होते. या शेतकऱ्यांनाही लाभ मिळावा, अशी सातत्याने मागणी होऊ लागली. त्यामुळे त्यांनाही लाभ देण्याचा महिनाभरापूर्वी निर्णय घेतला. त्यानंतर याद्या तपासणीचे काम सुरू झाले. शासकीय लेखापरीक्षकांकडून दोन- तीन वेळा याद्यांची तपासणी केली आहे. त्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवल्याचे कळते.

वास्तविक शेतकऱ्यांनी विविध कारणांसाठी बँका, पतसंस्थांकडून कर्जाची उचल केलेली आहे. कर्जाचा भरणा किंवा ते शक्य झाले नाही तर किमान फिरवाफिरवी तरी करावी लागते. प्रोत्साहन अनुदानाची रक्कम मिळेल आणि हा प्रश्न थोडा सोपा होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. त्यामुळे अनुदानाकडे त्यांचे डोळे लागले होते.

पण, या प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेतच त्यांचे आर्थिक वर्ष सरले. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतंत्र आर्थिक तजवीज करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. नव्या वर्षात तरी लवकरात लवकर अनुदान मिळावे, अशी मागणी होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com