Onion Rate : कांदा दर पडल्याने शेतकरी संतापले

Onion Market : कांद्याची मर्यादित आवक व देशभर कांद्याची उपलब्धता होण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने निर्यातबंदीची घोषणा केल्याने दर गडगडले. आता आवक वाढलेली आहे.
Onion Market
Onion MarketAgrowon

Nashik News : एकीकडे कांद्याची लागवड अडचणीत सापडली. त्यानंतर उत्पादनात घट दिसून आली. अशा परिस्थितीत कांद्याची मर्यादित आवक व देशभर कांद्याची उपलब्धता होण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने निर्यातबंदीची घोषणा केल्याने दर गडगडले. आता आवक वाढलेली आहे.

परिणामी देशांतर्गत पुरवठा वाढल्याने दिवसेंदिवस दरात घसरण होत आहे. त्यातच लासलगाव बाजार समितीत सोमवारी (ता. २९) सकाळच्या सत्रात कांद्याचे लिलाव सुरू झाल्यानंतर सरासरी दरात १०१ रुपयांची घसरण झाल्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले. निर्यातबंदी तत्काळ मागे घेण्यासाठी व कांदा दरात होणारी घसरण थांबविण्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले.

Onion Market
Onion Price : कांद्याच्या दरात घसरण सुरूच! सोलापूरनंतर नाशिक आणि पुण्यात भाव पडले

केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडल्याने नुकसान होत आहे. ते भरून काढण्यासाठी प्रतिक्विंटल किमान २ हजार रुपये अनुदान देण्याची मागणी या वेळी संघटनेने केली. तसेच कांदा निर्यातबंदी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे, युवक जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले, अक्षय पालवे, नितीन सुडके, बाळा कोल्हे, नीलेश ठाकरे आदी उपस्थित होते. दोन तासांनंतर कांद्याचे लिलाव पूर्ववत झाले तरी कांदा दरात कोणतीही सुधारणा दिसून आली नव्हती.

Onion Market
Lasalgaon Onion Market : कांदा दराच्या घसरणीत लिलाव पुन्हा सुरू

...तर फुकटच कांदा हवा असेल तर घेऊन जा

कुठेतरी शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळत असताना केंद्र सरकारने अचानक ७ डिसेंबर रोजी केलेल्या निर्यातबंदीमुळे कांद्याचे दर ७० टक्के कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. एकरी लाल कांद्याचे ७० ते ८० क्विंटल उत्पादन मिळते. कांदा पिकवण्यासाठी किलोला १५ ते २० रुपये खर्च येतोय आणि ८ ते १० रुपये किलोला बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात कांदा विक्री करतोय. केंद्र सरकारला फुकटच शेतकऱ्यांना कांदे पाहिजे असेल तर माझ्याकडे दोनशे ते अडीचशे क्विंटल कांदे काढले असून येऊन घेऊन जा, असे आवाहन कांदा उत्पादक शेतकरी केदारनाथ नवले यांनी केले.

सध्या कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नाही. आम्ही शेतकऱ्यांनी जगायचे कसे, शेतकरी मेला तरी चालेल पण शहरी ग्राहक वाचले पाहिजे, ही केंद्राची भूमिका बदलली पाहिजे.
एकनाथ शिंदे, कांदा उत्पादक शेतकरी, सातारे, ता. येवला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com