Agriculture Input : अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करा

Fake Seed : निविष्ठा खरेदीत गैरप्रकार आणि फसवणूक होण्याची शक्‍यता पाहता शेतकऱ्यांनी अधिकृत व्यवसायीकांकडून याची खरेदी करीत पक्‍के बिल घेतले पाहिजे.
Bogus Seed
Bogus Seed Agrowon
Published on
Updated on

Amaravati News : बियाणे व निविष्ठा खरेदीत होणारी फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत दुकानातूनच या साहित्याच्या खरेदीवर भर द्यावा, असे आवाहन तिवसा तालुका कृषी अधिकारी हेमलता इंगळे यांनी केले.

जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकीनंतर त्यांनी तिवसा तालुक्‍यातील खरीप लागवड क्षेत्र व इतर नियोजन याबाबतची माहिती दिली त्या म्हणाल्या, खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांची बियाणे व खते खरेदीची लगबग वाढली आहे. तिवसा तालुक्‍यात सुमारे ४० हजार ४१० हेक्‍टरवर विविध पिकांखालील क्षेत्र प्रस्तावीत आहे.

Bogus Seed
Amravati Bogus Seeds : अंजनगावसूर्जीत अनधिकृत बियाणे साठा जप्त

निविष्ठा खरेदीत गैरप्रकार आणि फसवणूक होण्याची शक्‍यता पाहता शेतकऱ्यांनी अधिकृत व्यवसायीकांकडून याची खरेदी करीत पक्‍के बिल घेतले पाहिजे. त्याआधारे कोणतीही फसवणूक झाल्यास दाद मागणे शक्‍य होते. खते किंवा इतर निविष्ठा खरेदीत लिंकिंग होत असल्यास त्याबाबतची तक्रार कृषी विभागाकडे करण्यात यावी. याद्वारे संबंधितावर कारवाई शक्‍य होणार आहे. बोगस निविष्ठांवर वॉच ठेवण्यासाठी भरारी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.=

Bogus Seed
Bogus Seed : बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा

...अशी आहे बियाणे मागणी

बियाणे बदल दरानुसार सोयाबीन ५११३ क्‍विंटल, बीटी कापूस १५ हजार पाकिटे व इतर बियाणे ५६९ क्‍विंटल लागणार आहे. त्यासोबतच युरिया २४७८, डीएपी १४८७, एमओपी ३१६, एसएसपी ३१२२, मिश्र खते ३१२७ अशी एकूण १० हजार ५६ टन रासायनिक खतांची मागणी आहे.

शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत व मान्यताप्राप्त कृषी सेवा केंद्रातूनच बियाणे व निविष्ठांची खरेदी करावी. त्याकरिता संबंधितांकडून पक्‍के बिल घेतले पाहिजे.
- हेमलता इंगळे, तालुका कृषी अधिकारी, तिवसा, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com