
Nashik News : शेतीमध्ये असलेल्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे. त्याच धर्तीवर आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी संघटितपणे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून काम हाती घेतले आहे. याच पद्धतीने शेतकऱ्यांनी संघटित होऊन आर्थिक प्रगती साधावी. त्यासाठी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले.
इगतपुरी तालुक्यातील बेलगाव, वासाळी, इंदोरे, खड्केद, पिंपळगाव मोर, धामणी, आंबेवाडी परिसरातील गावांनी एकत्र येत ''शुक्लतीर्थ आदिवासी शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीच्या पिंपळगाव मोर येथील कार्यालयाचे उद्घाटन कृषिमंत्री कोकाटे यांच्या हस्ते झाले.
त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाठ, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र वाघ, तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजना व त्याचे लाभ कसे घ्यावेत, याबाबत चर्चात्मक मार्गदर्शन केले.
मंत्री कोकाटे म्हणाले, की पारंपरिक शेतीला नवे पर्याय देताना शेतीमालाची विक्री हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन खर्च कमी करावा. यासह शेतीमालाचे मूल्यवर्धन, प्रक्रिया गुणवत्तापूर्ण पद्धतीने करावी. त्यातून बाजारपेठ मिळून शेतकऱ्यांना नव्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करून उत्पादित शेतीमाल ग्राहकांपर्यंत कसा पोहोचेल याचे नियोजन करावे तसेच भरड धान्यावर प्रक्रिया करू नाविन्यपूर्ण उत्पादनांची विक्री करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच शेती क्षेत्रात राबणाऱ्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची ही प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
माजी आमदार श्री. झोले, बाळासाहेब गाढवे, चंद्रकांत खाडे, श्रावण देवरे, नथू पिचड, सुनील वाजे, पांडू शिंदे, डॉ. जयंत कोरडे, उदय जाधव, केरू खतेले, नामदेव साबळे, संतोष साबळे, गोविंद धादवड, संदीप भोसले, सुदाम भोसले, जगन बेंडकोळी, योगेश भोसले, अरुण घोरपडे, दत्तू भांगरे, रोहन काकड, धनराज बेंडकोळी, तृष्णा खादे, परसराम खादे, रामदास भोसले, अलका काकड, जनाबाई भांगरे, चंद्रकला धादवड, सोमनाथ कोरडे, देवराम खतेले, लक्ष्मण खतेले, प्रकाश कोरडे, श्री. गीते साहेब, रणजीत आंधळे, विजय कापसे, रमेश वाडेकर आदींसह परिसरातील शेतकरी व महिला उपस्थित होत्या. खासदार राजाभाऊ वाजे यांनी कंपनी कार्यालयास भेट देऊन शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.