Ahilyanagar News: शेतकऱ्यांपुढे भाकड जनावरांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करून विदेशी गोवंश तसेच जर्सी व व्होस्टीन भाकड गाई सदर कायद्यातून वगळण्यात याव्यात, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी यांसह विविध मागण्यांसाठी गुरुवारी (ता. २१) श्रीरामपूरला प्रांताधिकारी कार्यालयात शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे. .शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्यासह तालुका अध्यक्ष युवराज जगताप, डॉ. दादासाहेब आदिक, साहेबराव चोरमल, सागर गिऱ्हे, संतोष पटारे, संजय वमने, शिवाजीराव पटारे, सतीश नाईक, संदीप उघडे, सिकंदर शेख, शरद असणे, प्रमोद ताके, सुजित बोडखे, इंद्रभान चोरमळ, संजय काळे, अशोक काळे, बाबासाहेब पवार, ज्ञानदेव चक्रनारायण, अनिल रोकडे, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्राधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे..Farmers Protest: भाकड पशुधनप्रश्नी आंदोलन करणार.‘‘शेतकऱ्यांपुढे सध्या भाकड जनावरांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ही जनावरे जगवताना शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे. सरकारने देशाची भूक भागविण्यासाठी संकरित बियाणे, कीटकनाशके बरोबरच संकरित गाई परदेशातून आयात केल्या. तत्कालीन केंद्र सरकारच्या या महत्त्वकांक्षी निर्णयामुळे देशातील जनतेची भूक भागत आहे..परंतु मोदी सरकारने गरज नसताना गोवंश हत्या बंदी कायदा अस्तित्वात आणून संकरीत गाई व्यावसायिक तत्त्वावर जोपासणाऱ्या शेतकऱ्यासाठी हानिकारक ठरला आहे. गोवंश हत्या बंदी कायदा येण्यापूर्वी आपल्या देशातून मोठ्या प्रमाणात दूध भुकटी व दुग्धजन्य पदार्थांसह भाकड जर्सी -होल्स्टिन गाई व गोऱ्ह्याचे बिफ निर्यात होऊन शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत होते. या निर्यातीत भारताने डेन्मार्कसारख्या देशालाही मागे टाकले होते..Farmer's Jal Samadhi Protest : युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात गोदापात्रात आंदोलन.त्यामुळे सहाजिकच परकीय चलन देशात येत असल्यामुळे डॉलर व रुपयांमध्ये थोड्याफार प्रमाणात संतुलन राखले जात होते. सध्या कुरेशी समाजाकडून गोवंश जनावरांची खरेदी-विक्री बंद असल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. संकरित गाईंच्या वासरांची मोठी अडचण झाली आहे..त्यामुळे गोवंश हत्याबंदी कायद्यामध्ये सुधारणा करून देशी गोवंश हत्याबंदी कायदा करावा, गोशाळेप्रमाणे पशुपालकांना थेट गोठ्यात प्रति जनावर मासिक वीस हजार रुपये अनुदान द्यावे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यांसह अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांसाठी शेतकरी संघटना गुरुवारी (ता. २१) श्रीरामपूरला प्रांताधिकारी कार्यालयात आंदोलन करणार आहे. या वेळी संकरित गाईंची वासरे कार्यालयात सोडण्यात येतील, असे सांगण्यात आले..सध्या विदेशी भाकड जनावरे व जर्सी गोऱ्हे यांच्या पालन पोषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने दूध धंदा दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या तोट्याचा होत आहे. गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची या कायद्याच्या जोखडातून मुक्तता करण्यासाठी शेतकरी संघटना यावर तीव्र अंदोलन उभारणार आहे.- अनिल औताडे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, अहिल्यानगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.