Mahavitaran : अनागोंदी कारभाराविरोधात शेतकऱ्यांची ‘महावितरण’वर धडक

Agriculture Electricity : गेल्या आठवड्याभरापासून निफाड तालुक्यात विजेचा प्रचंड लपंडाव सुरू असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले होते.
Agriculture Electricity
Agriculture ElectricityAgrowon
Published on
Updated on

Nashik News : भारनियमन व वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराविरोधात निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी नाशिकरोड येथील वीज कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. विजेच्या विविध प्रश्‍नांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरत वीज वितरण कंपनीचा कारभार न सुधारल्यास निफाड तालुक्यातील सर्व कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा अनिल कदम यांनी दिला.

गेल्या आठवड्याभरापासून निफाड तालुक्यात विजेचा प्रचंड लपंडाव सुरू असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले होते. पाणी असूनही विजेअभावी उभी शेतीपिके जळून चालली आहेत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी माजी आमदार अनिल कदम यांच्या उपस्थितीत प्रभारी अधीक्षक अभियंता राजाराम डोंगरे, प्रशासन कार्यकारी अभियंता वाय. बी. निकम, सहायक अभियंता शिंदे यांच्यासमोर अडचणी मांडल्या.

Agriculture Electricity
Agriculture Electricity : अनेक शिवारांत रोहित्र दुरुस्तीबाबत चालढकल

प्रभारी अधीक्षक अभियंता डोंगरे यांच्या दालनात वीज वितरण कंपनीच्या अनागोंदिविरोधात कदम यांनी संताप व्यक्त करत शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या वीज वितरण कंपनीला निर्वाणीचा इशारा देत टाळे ठोकून दणका देत आंदोलन करण्याची तंबी दिली. या वेळी मुख्य अभियंता कुमठेकर व प्रभारी अधीक्षक अभियंता राजाराम डोंगरे यांनी निफाड तालुक्यातील विजेच्या समस्या सोडविण्याचे आश्‍वासन अनिल कदम व शिष्टमंडळाला दिले.

Agriculture Electricity
Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीज संयोजनाचा प्रश्‍न कायम

गोदाकाठ परिसरात बिबट्याची दहशत असल्याने शेतकऱ्यांनी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी केली. अनेक ठिकाणी नवीन ट्रान्स्फॉर्मरची मागणीही या वेळी शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांच्यावतीने प्रातिनिधिक स्वरूपात सुधीर कराड, शरद कुटे, खंडू बोडके पाटील, दत्तू भुसारे, भूषण शिंदे, गणेश कापसे, सचिन खडताळे, किरन सुरवाडे, योगेश भुसारे, नितीन गवळी, कृष्णा आघाव, संतोष मत्सगार, संदीप बोडके, रमेश फड, सतीश कुटे, ज्ञानेश्‍वर पोटे, जितेंद्र बाजारे, युवराज शिंदे, शरद आव्हाड यांनी समस्या मांडल्या.

वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली. अनिल कदम व शेतकऱ्यांनी प्रभारी अधीक्षक अभियंता राजाराम डोंगरे यांना निवेदन दिले. या वेळी आंदोलनास शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नीलेश पाटील, तालुकाप्रमुख सुधीर कराड, दत्तू भुसारे, खंडू बोडके पाटील, राष्ट्रवादीचे गणेश कापसे, भूषण शिंदे, सुनील कदम, शरद खालकर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com