Kharif Sowing : अहिल्यानगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या वेगात सुरू

Kharif Season 2025 : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा पावसाला लवकर सुरुवात झाली. मे महिन्यात झालेल्या पावसाने मशागती लवकर उरकल्यामुळे खरिपाच्या पेरण्या वेगात सुरू आहेत.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा पावसाला लवकर सुरुवात झाली. मे महिन्यात झालेल्या पावसाने मशागती लवकर उरकल्यामुळे खरिपाच्या पेरण्या वेगात सुरू आहेत. आतापर्यंत सुमारे आडीच लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. कापूस लागवडही वेगात सुरू आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात खरिपाचे ६ लाख ९३ हजार ३४२ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा अहिल्यानगर जिल्ह्यात मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यंदा तब्बल मेमधील पावसाची २२० मिलिमीटर नोंद झाली. जून महिन्यातही मृग जोरदार बरसत असून १३ जूनपर्यंत ४६.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पावसामुळे पेरण्यांना लवकर सुरुवात झाल्याने यंदा आतापर्यंत २ लाख ४२ हजार ५८९ हेक्टर क्षेत्रावर विविध खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. आतापर्यंत ३०.७८ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

Kharif Sowing
Kharif Sowing : पावसाच्या भरवशावर पेरण्या केलेल्यांचे डोळे आकाशाकडे

पाऊस सुरुवातीला आला तर मूग, उडीद आणि तुरीचे क्षेत्र वाढते हे ठरलेले आहे. आतापर्यंत तुरीची १८ हजार हेक्टरपर्यंत लागवड झाली असून मुगाची २८ हजार १४५ हेक्टर, उडदाची ३५ हजार ८८९ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

मका पेरणीलाही शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येत असून मक्याची सर्वाधिक ३१ हजार ३८८ हेक्टर म्हणजे ४८ टक्के पेरणी झाली आहे. भाताची २ हजार हेक्टरपर्यंत लागवड झाली असून बाजरीचे क्षेत्र यंदाही कमीच राहण्याची शक्यता आहे. बाजरीचे सरासरी क्षेत्र यंदाही कमीच असून आतापर्यंत २२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : मराठवाड्यात १५ लाख हेक्टरवर खरीप पेरणी

पन्नास हजार हेक्टवर कापूस लागवड

अहिल्यानगर जिल्ह्यातील अलिकडच्या काही वर्षांपासून शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, श्रीरामपूर आदी तालुक्यात कापूस लागवडीला प्राधान्य दिले जात आहे.

आता कापसाचे सरासरी १ लाख ५६ हजार ७९४ हेक्टर सरासरी क्षेत्र असून आतापर्यंत पन्नास हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. सर्वाधिक शेवगाव तालुक्यात १६ हजार, नेवाशात १० हजार, राहुरीत साडे अकरा हजार, पाथर्डीत चार हजार हेक्टरवर लागवड झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com