Pomegranate Productivity : डाळिंब केंद्राच्या विविध तंत्रज्ञानाचा वापर करत उत्पादकता वाढवावी

Pomegranate Research Center : राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने शेतकऱ्यांसाठी डाळिंबाच्या विविध वाणांसह काही तंत्रज्ञानाच्या शिफारसी केल्या आहेत.
Pomegranate Productivty
Pomegranate ProductivtyAgrowon
Published on
Updated on

Solapur News : राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने शेतकऱ्यांसाठी डाळिंबाच्या विविध वाणांसह काही तंत्रज्ञानाच्या शिफारसी केल्या आहेत. शेतकऱयांनी त्याचा पुरेपूर वापर करून डाळिंबाची गुणवत्ता राखण्यासह उत्पादकता वाढवावी, असे आवाहन राष्ट्रीय डाळिंब संशोधन केद्राचे प्रभारी संचालक डॉ. परमेश्वर शिरगुरे यांनी बुधवारी (ता. २६) केले.

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या २० वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. शिरगुरे बोलत होते. प्रमुख पाहुणे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. नितीनकुमार रनशूर, आयआयएमआरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बसवराज रायगोंड यावेळी उपस्थित होते.

Pomegranate Productivty
Pomegranate Farming : गुणवत्तापूर्ण, निर्यातक्षम डाळिंब उत्पादनात सातत्य

डॉ. शिरगुरे म्हणाले, की संशोधन केंद्राने डाळिंब उत्पादकांसाठी संशोधन, तंत्रज्ञान या सर्वस्तरावर काम केले आहे. यापुढेही शेतकऱ्यांना आम्ही मार्गदर्शन आणि माहितीसाठी तत्पर आहोत, असे सांगितले. डॉ. तांबडे यांनी शेतकऱ्यांच्या विकासातील भूमिकेवर प्रकाश टाकला. डॉ. रायगोंड, डॉ. रणशूर यांनीही भाषण केले. डॉ. दिनेश बाबू आणि डॉ. संग्राम धुमाळ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले, तर आभार प्रदर्शन डॉ. रंजन सिंग यांनी केले.

Pomegranate Productivty
Pomegranate Production : डाळिंब उत्पादनामध्ये २० टक्के घट शक्य

शेतकरी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कर्नाटक येथील श्री. नटेश एसी आणि नाशिक येथील रामहरी सुरसे यांना प्रगत शेतकरी म्हणून पुरस्कार देण्यात आले. स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत संस्थेतील सफाई कामगारांना सफाईमित्र सन्मान पुरस्कार देण्यात आले.

यासोबतच अनुसूचित जाती उपयोजना (SCSP) अंतर्गत अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना ब्रश कटर वाटप करण्यात आले. तसेच स्थापनदिनाचे औचित्य साधून डाळिंब उत्पादनावरील पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. आर बी राय यांनी हिंदी भाषेचे महत्व विशद केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com