Agricultural Festival : शेतकऱ्यांनी कृषी महोत्सवात सहभाग घ्यावा

या महोत्सवाचे आयोजन सकाळी १० ते सायं. ८ वाजेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती, नवा मोंढा, नांदेड येथे करण्यात येणार आहे.
 Agricultural Festival
Agricultural FestivalAgrowon
Published on
Updated on

Nanded News : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (Millet Year) २०२३ चे औचित्य साधून कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्हा कृषी महोत्सवाचे (Agriculture Festival) आयोजन ता. एक ते पाच मार्च २०२३ या कालावधीत करण्यात आले आहे.

या महोत्सवास सर्वाधीक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा तसेच ग्राहकांनी शेतकऱ्यांकडून थेट शेतमाल खरेदी करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

 Agricultural Festival
Agrowon Podcast : गव्हाचे दर हमीभावाच्या खालीच राहणार?

या महोत्सवाचे आयोजन सकाळी १० ते सायं. ८ वाजेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती, नवा मोंढा, नांदेड येथे करण्यात येणार आहे.

या कृषी महोत्सवात शासकीय ३० स्टॉल, कृषी निविष्ठा २० स्टॉल, कृषी तंत्रज्ञान व सिंचन २० स्टॉल, खाद्य पदार्थ २० स्टॉल, कृषी प्रक्रिया १०, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व महिला बचत गट १०० स्टॉल असे एकूण २०० स्टॉल उभारण्यात येणार आहेत.

 Agricultural Festival
Cold Weather : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडी कायम

कृषी तंत्रज्ञान व सिंचन,कृषी निविष्ठा या खासगी स्टॉलसाठी नाममात्र रु.५००० भाडे आकारण्यात येणार आहे.तसेच शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी,महिला बचत गट,शासकीय व निमशासकीय कार्यालये यांच्यासाठी स्टॉल नि:शुल्क आहेत.

शासकीय स्टॉल बुकिंगसाठी एस. बी. बोरा मो. क्र. ९४२२७५२८१७, कृषी निविष्ठा साठी श्री. हुंडेकर मो. क्र. ९०४९१५०६३१, कृषी तंत्रज्ञान व सिंचन व्ही. जे. लिंगे मो. क्र. ७०६६१०५३८४, शेतकरी गट व उत्पादक कंपनी साठी श्रीहरी बिरादार मो. क्र. ८२७५५५६३१६ व महेश तहाडे मो. क्र. ९९२३४०५१६६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com