Farmer Protest : कांदा दराअभावी दहिवेलला शेतकऱ्यांचा रास्ता रोको

Onion Rate : कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने, शिवाय आवक वाढली की भाव गडगडत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी दहिवेल (ता. साक्री) येथे रास्ता रोको आंदोलन केले.
Farmer Protest
Farmer ProtestAgrowon
Published on: 
Updated on: 

Dhule Onion Producer Protest : कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने, शिवाय आवक वाढली की भाव गडगडत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी दहिवेल (ता. साक्री) येथे रास्ता रोको आंदोलन केले.

पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतरही शेतकरी माघार घेण्यास तयार नव्हते. शेवटी पोलिसी खाक्यानंतर शेतकऱ्यांनी कांद्याला अपेक्षित भाव मिळावा, अशी मागणी करत वाहतूक सुरळीत होण्यासाठी सहकार्य केले.

Farmer Protest
Onion Market: कांदा भावात १५ दिवसांमध्ये सुधारणा

पिंपळनेर (ता.साक्री) येथील बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी ३०० ते ११०० रुपयांचा दर मिळत आहे. याउलट दहिवेल येथील सोमेश्‍वर कृषी मार्केटमध्ये सरासरी प्रतिक्विंटल सातशेपेक्षा अधिक दर दिला जात नाही.

शिवाय कांद्याची आवक वाढली तर सरासरी दोनशे, तीनशे, चारशे रुपये प्रतिक्विंटल दर दिला जातो म्हणजेच दर गडगडत असल्याने संतप्त शेतकरी आंदोलनावर उतरले. त्यांनी रास्ता रोको आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले.

शेतकऱ्यांची भूमिका

आंदोलक शेतकरी लक्ष्मण सूर्यवंशी, डोंगरू बहिरम, बाबूलाल सूर्यवंशी, बारकू ठाकरे, तुषार साबळे, उमेश बहिरम, विश्राम साबळे, छोटू सूर्यवंशी, गबाजी साबळे, तुषार साबळे यांच्यासह शेतकऱ्यांनी कांद्याप्रश्‍नी रास्ता रोको आंदोलन करीत संताप व्यक्त केला.

त्यांनी निवेदनाद्वारे सांगितले, की दहिवेल येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. कष्टाने पीक घेऊनही शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक केली जाते. कांद्याला चांगला भाव दिला नाही तर पुन्हा मोठ्या संख्येने तीव्र आंदोलन केले जाईल.

पिंपळगाव येथे प्रतिकिलो १५ ते १६ रुपयांनी कांदे विक्री होतात. दहिवेल येथील सोमेश्वर कृषी मार्केट येथे कमीत कमी १०० वाहनांचा लिलाव झालेला होता. मात्र, एकाही वाहनाला सात रुपयांवर भाव दिला गेला नाही. इतर मार्केटपेक्षा दहिवेल येथे निम्मा भाव दिला जात असल्याने शेतकरी संतप्त झाले व त्यांना आंदोलन करावे लागले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.