Parbhani News: कृषी पणन मंडळ अंतर्गंत परभणी व हिंगोली जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या केंद्रावर हमीभावाने (प्रतिक्विंटल ५३२८ रुपये) सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद असल्याचे दिसत आहे. परभणी जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या केंद्रावर खरेदी झाली नव्हती. हिंगोली जिल्ह्यातील ३ बाजार समित्यांच्या केंद्रावर ३२ शेतकऱ्यांचे ५८६ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली. तर या दोन जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या केंद्रांवर १ हजार १८९ शेतकऱ्यांच्या २१ हजार क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे, असे पणन मंडळाच्या सूत्रांनी सांगितले..किमान आधारभूत किंमत दराने सोयबीन खरेदीसाठी कृषी पणन मंडळ अंतर्गंत परभणी व हिंगोली जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांची मिळून एकूण २९ केंद्र मंजूर करण्यात आली आहेत. परभणी जिल्ह्यातील जिंतूर, सेलू, मानवत या ३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांना तर १४ शेतकरी उत्पादक कंपन्यांची मिळून एकूण १७ केंद्र मंजूर आहेत..Soybean Procurement Center: अकोट सोयाबीन केंद्रावर पैशांची मागणी करणारा ग्रेडर कार्यमुक्त.सोमवार (ता. ८) पर्यंत जिंतूर बाजार समिती केंद्रावर १६० शेतकरी, सेलू येथे २०२ आणि मानवत येथे १३८ असे ३ केंद्रावर एकूण ५०० शेतकऱ्यांनी तर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या केंद्रावर ११ हजार २०८ मिळून असे एकूण ११ हजार ७०८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली..Soybean Procurement: सोयाबीन खरेदीसाठी 'चिरीमिरी' द्यावी लागते; शेतकऱ्यांची फसवणूक, रणधीर सावरकरांचा गंभीर आरोप .बाजार समित्यांच्या केंद्रावर सोयाबीनची खरेदी झाली नव्हती. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या केंद्रावर १ हजार ७८ शेतकऱ्यांच्या १९ हजार २७ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, आखाडाबाळापूर, सेनगाव या ४ कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि ८ शेतकरी उत्पादक कंपन्यांची मिळून १२ खरेदी केंद्र मंजूर करण्यात आली आहेत. .मंगळवार (ता. ९) पर्यंत केंद्रांवर ६ हजार ८८० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यात हिंगोली बाजार समितीच्या केंद्रावर १०० शेतकरी, सेनगाव केंद्रावर २०४ शेतकरी, कळमनुरी केंद्रावर ७३१, आखाडा बाळापूर केंद्रावर ६८५ शेतकरी मिळून एकूण १ हजार ७२० तर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या केंद्रावर ५ हजार १६० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. हिंगोली, कळमनुरी, आखाडा बाळापूर बाजार समित्यांच्या केंद्रावर ३२ शेतकऱ्यांचे ५८६ क्विंटल तर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या केंद्रांवर १११ शेतकऱ्यांचे २ हजार २७८ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.