Rural Reality: शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असताना त्यांचे प्रतिबिंब साहित्यात अत्यंत कमी प्रमाणात दिसून येते. या आव्हानात्मक परिस्थितीचे वास्तव साहित्यातून प्रखरपणे मांडली जाणे आवश्यक असून, त्यासाठी नांगरट साहित्य संमेलनासारखे उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावतील, असा आशावाद ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांनी व्यक्त केला..शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था आणि जयसिंगपूर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसरे नांगरट साहित्य संमेलन रविवारी (ता. ७) झाले. त्या वेळी संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. लोमटे यांनी शेतकरी जीवनातील संघर्ष, ग्रामीण वास्तव आणि कृषी क्षेत्रासमोरील संकटे यांचे साहित्यिक अभिव्यक्तीतून प्रभावी चित्रण होण्याची गरज अधोरेखित केली..Farmer Issue: न्यायाधीशांना मोफत वीज; मात्र ‘शेतकऱ्यांना पाणी-वीज नाही; शिवसेनेची सरकारवर टीका.या वेळी ज्येष्ठ पत्रकार, लेखक, विचारवंत पी. साईनाथ, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. मोहन पाटील, शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते जयकुमार कोले यांना ‘स्वाभिमानी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..स्वागताध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, शेतकरी अनेकवेळा विनोद, खलनायक किंवा विकृत प्रतिमा म्हणून रंगवला गेला; पण त्याच्या वास्तविक समस्या कर्जबाजारीपणा, सावकारशाही, अपुरी सिंचनव्यवस्था, चुकीची धोरणे, शिक्षणातील असमानता, स्त्रीशोषण, जातीय विषमता आणि पर्यावरणीय संकट याकडे कमी लक्ष दिले गेले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपाय सांगणारे, बंडखोर आणि वास्तववादी साहित्य निर्माण करणे हा या संमेलनाचा उद्देश आहे..Tribal Farmer Issue: हमीभावाच्या प्रतीक्षेत हजारो आदिवासी शेतकरी.दुपारच्या सत्रात ‘शेतकऱ्यांचा आसूडानंतरच्या आजपर्यंतच्या शेतकरी चळवळी’ या विषयावर परिसंवाद झाला. या परिसंवादाचे अध्यक्ष प्रा. डॉ. गौतमीपुत्र कांबळे होते. प्रवीण बांदेकर, डॉ. महेंद्र कदम, प्रसाद कुलकर्णी सहभागी झाले. त्यानंतर ‘ऱ्हास होत चाललेली कृषी संस्कृती आणि कृषी सर्जनशीलता’ या विषयावर दुसरा परिसंवाद झाला. विजय चोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली नामदेव माळी आणि प्रा. संदीप जगताप सहभागी झाले..सायंकाळी निमंत्रितांचे कवी संमेलन झाले. स्वाती शिंदे-पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील नामवंत कवी सहभागी झाले. डॉ. महावीर अक्कोळे, डॉ. सुभाष अडदांडे, जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य सुरत मांजरे आदींसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते..शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी लढा गरजेचा : पी. साईनाथपी. साईनाथ म्हणाले, ‘‘गेल्या काही दशकांत नव उदारमतवादी आर्थिक धोरणांचा प्रभाव कृषी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात पडला आहे. या धोरणांमुळे शेतीचा प्रवास हळूहळू कॉर्पोरेटायझेशनकडे सुरू झाला आहे. एकेकाळी शेतकरी आपल्या जमिनीचा, उत्पादनाचा आणि निर्णयांचा मालक होता; परंतु आज बी-बियाणे, खते, कीटकनाशके, बाजारपेठ आणि पतपुरवठा या सर्व गोष्टींवर मोठ्या कंपन्यांचे वर्चस्व वाढताना दिसत आहे. आणखी एक गंभीर प्रश्न म्हणजे शेतकरी आत्महत्यांचा. .देशातील शेतकरी आत्महत्या हा केवळ आकड्यांचा विषय नाही, तर हजारो कुटुंबांच्या उद्ध्वस्त आयुष्याचा प्रश्न आहे. दुर्दैवाने अनेक वेळा सरकारकडून या आत्महत्यांची खरी आकडेवारी लपवली जाते. शेतकरी, शेतमजूर आणि ‘इतर’ अशा वर्गवारीत आत्महत्यांची नोंद करून वास्तव चित्र झाकण्याचा प्रयत्न होत आहे. हे चित्र बदलायचे असेल सर्वांनी एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.