Hingoli News: ‘‘शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त बाजारभाव मिळण्यासाठी स्पॉट मार्केट (कृषी उत्पन्न बाजार समिती) आणि वायदे बाजार हे दोन्ही चालू राहिले पाहिजेत. निजामाबाद येथील एनसीईडीएक्स गोदामातील हळद भेसळ प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. वायदे बाजार बंद होऊ नयेत यासाठी नोव्हेंबरमध्ये मुंबई येथील ‘सेबी’च्या कार्यालयावर धडक देणार आहे. .यामध्ये राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने सहभागी व्हावे लागेल,’’ असे आवाहन शेतकरी संघटनेचे प्रांतअध्यक्ष ललित बहाळे यांनी केले.हिंगोली जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डावर गुरुवारी (ता. २८) आयोजित हळद परिषदेत श्री. बहाळे बोलत होते..Maharashtra Farmer Protest: शेतमजूर, शेतकरीप्रश्नी मुंबईत २८ ऑक्टोबरला धडक : कडू.शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीप्रसाद ढोबळे (हिंगोली), शिवाजी शिंदे (नांदेड), उत्तमराव वाबळे, खंडेराव पोले, वसमत बाजार समितीचे संचालक दौलत हुंबाड, सचिव एस. एन. शिंदे, सूर्या शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद बोरगड, मोहन भिसे, जयदीप बोरगावकर, जुनेद खान, विकास कदम, राजू कुटे आदी उपस्थित होते..श्री. बहाळे म्हणाले, ‘‘बाजार शेती करण्याचे मोठे साधन वायदे बाजार आहे. परंतु दुर्दैवाने वायदे बाजारात शेतकऱ्यांचा सहभाग नाही. व्यापाऱ्यांचा सहभाग जास्त आहे. शेती करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना वायदे बाजाराचे ज्ञान आत्मसात करावे लागेल. कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी वायदे बाजारातील व्यवहाराबद्दल शेतकरी प्रशिक्षणे आयोजित करावीत..Farmer Protest: शेतकरी संघटनांकडून संघर्ष समितीची स्थापना; शेतकरी प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलन जाहीर.केंद्र सरकार वायदे बाजार चालू ठेवण्याच्या मनःस्थितीत नाहीये. एनसीईडीएक्ससमवेत आणखी चार-पाच स्पर्धक प्लॅटफॉर्म तयार करावेत, अशी मागणी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे करणार आहोत. ज्यांना वायदे बाजार नकोय त्यांनीच निजामबाद येथील गैरप्रकार केला केला की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.’’.ढोबळे म्हणाले, ‘‘वायदे बाजारातून हळदीला वगळण्याचे काही व्यापाऱ्यांचे षड्यंत्र आहे. वायदे बाजारातून वगळण्यात आलेल्या सोयाबीन, तूर, मूग, हरभरा या शेतीमालाचा वायदे बाजारात समावेश करावा.’’ .हुंबाड म्हणाले, ‘‘एनसीईडीएक्स ही संस्था राहिली पाहिजे. त्यामध्ये हळददेखील राहिली पाहिजे. दलालांची मक्तेदारी संपुष्टात आली पाहिजे. हळद परिषदेत मराठवाडा, विदर्भातील विविध जिल्ह्यांतील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते..परिषदेत मंजूर करण्यात आलेले ठरावनिजामाबाद येथील गोदामातील हळदीतील भेसळ प्रकरणी एनसीईडीएक्सला तंबी द्यावी. गैरप्रकारची चौकशी करावी.सेबीच्या कलम १६ मध्ये बदल करावेत. एकाही शेतीमालाला वायदे बाजारातून बाहेर काढू नये. नवीन शेतीमालाचा वायदे बाजारात अंतर्भाव करावा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.