Crop Damage : अतिवृष्टीच्या मदतीची खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षाच

Heavy Rain Update : मागील हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. अद्यापही खामगाव तालुक्‍यातील शेतकरी वंचित आहेत.
Crop Damage
Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Buldana Rain News : मागील हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. अद्यापही खामगाव तालुक्‍यातील शेतकरी वंचित आहेत. सर्वेक्षण करीत मदत मंजूर झाल्‍यानंतरही शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात मदत वळती करण्यात आलेली नाही.

तालुक्‍यातील पिंपळगाव राजा, पोरज, काळेगाव, तांदूळवाडी, निमकवळा, ढोरपगाव या भागांत अतिवृष्टीमुळे पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

खरीप हंगामात सप्‍टेंबर महिन्‍यात वादळी वाऱ्यासह झालेल्‍या पावसाने पोरज, भालेगाव बाजार, हिवरा बु., सावरगाव खुर्द, तांदूळवाडी, निमकवळा, काळेगाव, ढोरपगाव या गावांमध्ये खरीप हंगामातील कपाशी, सोयाबीन, तूर, केळी, उडीद, मूग, तीळ, ज्‍वारी इत्‍यादी पिके भुईसपाट झाली होती.

नुकसानीचा सर्वे करण्याचे आदेश शासनाच्‍या वतीने देण्यात आले होते. त्‍या अनुषंगाने मंडळ अधिकारी तलाठी, कृषी सहाय्यक यांनी झालेल्‍या नुकसानाचे पंचनामे केले.

Crop Damage
Heavy Rain Update : भंडारा, गोंदियात अतिवृष्टी

शेतकऱ्यांना मदत देण्याचा अहवाल स्‍थानिक अधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठवला होता. शासनाने तत्‍काळ मदतीची घोषणाही केली हाती. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना झालेल्‍या नुकसानीची मदत मिळाली नाही.

खरीप हंगामातील नुकसानीची भरपाई मिळाली नाही. यंदा या परिसरातील शेतकऱ्यांनी पावसाची प्रतीक्षा करीत जुलै महिना उजाडल्‍याने पेरणीची जोखीम पत्‍करली आहे.

शासकीय कार्यालयात उडावाउडवीची उत्‍तरे

शेतकरी वेळोवेळी या मदतीसाठी तहसील कार्यालयामध्ये जात आहेत. आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्‍स संबंधित तलाठी यांच्‍याकडे देण्याचे सांगण्यात येते. उडवाउडवीची उत्तरे तहसील कार्यालयातील कर्मचारी शेतकऱ्यांना देतात. शेतकऱ्यांनी संबंधित कागदपत्रांची पूर्तता केली आहे. मात्र, शासनाकडून मदत शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात जमा झाली नाही.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तर अधिकारी ही मदत शासन स्तरावरून शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात अनुदान जमा होईल असे सांगत वेळ मारून नेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com