Pune News: आदिवासी, शेतमजूर आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर तोडगा न निघाल्याने माकप आणि किसान सभेच्या नेतृत्वाखालील लाँग मार्च आज (ता.२७) कसारा घाट ओलांडून ठाणे जिल्हात पोहोचल.मुख्य प्रवाहातील माध्यमे आणि सोशल मीडियावर या लाँग मार्चला मिळणाऱ्या व्यापक प्रसिद्धीमुळे सरकारवर दबाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंगळवारी मुंबईतील मंत्रालयात शेतकरी शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्याचे शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी सांगितले. .मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालायाला घेराव…माकप आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला हजारो शेतकऱ्यांचा लाँग मार्च ठाणे जिल्हात पोहोचला आहे.आदिवासी, शेतकरी, महिला-पुरुष मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर शासनाकडून शिष्टमंडळाला आश्वासक तोडगा न निघाल्याने मुंबईत मंत्रालय आणि राज्य सचिवालयाला घेराव घालण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. हा लाँग मार्च ३ फेब्रुवारी रोजी मुंबईत दाखल होणार असल्याने शासनदरबारी हालचाली वाढल्या होत्या. शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे..Farmer Long March: ‘लाल वादळ’ नाशिकच्या वेशीवर.किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी सांगितले की, “मागच्या वर्षीही आम्ही मोर्चा काढला होता, पण मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा पायी चालण्याची वेळ आली आहे. सध्या सुमारे ६० हजार शेतकरी सहभागी असून, ही संख्या पुढील काळात एक लाखांपर्यंत जाऊ शकते.” सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर लोकशाही मार्गाने संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला..Farmer Long March: माकपचा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर लाॅंग मार्च .शिष्टमंडळासोबत चर्चा निष्फळ…मुख्य प्रवाहातील माध्यमे आणि सोशल मीडियावर या लाँग मार्चला मिळणाऱ्या व्यापक प्रसिद्धीमुळे सरकारवर दबाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंगळवारी मुंबईतील मंत्रालयात शेतकरी शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्याचे शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी सांगितले. या शिष्टमंडळात डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे. पी. गावीत, आमदार विनोद निकोले, उमेश देशमुख, सुभाष चौधरी, इंद्रजित गावीत, इरफान शेख यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता. तसेच या आंदोलनात दिंडोरी, सुरगाणा, कळवण, चांदवड, पेठ, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या आदिवासीबहुल भागांतून शेतकरी मोठ्या संख्येने उतरले आहेत..आंदोलकांच्या मागण्या…या लाँग मार्चमधून वनाधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, आदिवासींना वनजमिनींचे कायदेशीर हक्क, गायरान व वनजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना सातबारा उतारे, नदीजोड प्रकल्प, स्थानिक भागात पाणी उपलब्ध करून देणे, शिक्षणाचे खाजगीकरण थांबवणे आणि शेतीमालाला किमान आधारभूत किंमत देणे, अशा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत. आता या मागण्यांवर सरकार तोडगा काढते की शेतकरी आंदोलन आणखी तीव्र होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.