BuldhanaNews: पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ स्पर्धा ही संपूर्ण राज्यामध्ये घेण्यात येत आहे. गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा उत्पादनावरील आर्थिक खर्च कमी व्हावा व उत्पादनात वाढ व्हावी..तसेच शेतकऱ्यांनी सुधारित शेती पद्धतीचा अवलंब करावा या उद्देशाने घेण्यात येत असलेल्या या फार्मर कप स्पर्धेचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. मलकापूर तालुक्यातील ५४ शेतकऱ्यांनी यात सहभागी होत गटशेतीचे धडे गिरवले..Farmer Training: खुटबाव येथे केळी पिकावरील शेतीशाळा.या प्रशिक्षणासाठी मलकापूर तालुक्याची पहिली बॅच ही अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे कृषी विभाग, ‘उमेद’ व पाणी फाउंडेशन यांच्या माध्यमातून प्रशिक्षणात सहभागी झाले. तीन दिवसांचे हे रहिवासी प्रशिक्षण पूर्ण करून हे सर्व शेतकरी गावी परतले आहेत..Farmers Training : विद्यापीठात कडधान्य, तृणधान्य व फळ प्रक्रियेवर शेतकरी प्रशिक्षण.या सर्व प्रक्रियेमध्ये तालुका कृषी अधिकारी ललित सूर्यवंशी, नोडल अधिकारी प्रमोद सोनोने, उमेद अभियानाचे व्यवस्थापक श्री. बोदडे, श्री. राठोड, प्रशिक्षक जीवन गावंडे, सिद्धार्थ कवडे,अनुराधा घोरड,.महादेव निपाने, मनीषा राठोड, आश्विनी शिरसाठ, फिल्ड ऑफिसर ब्रह्मदेव गिऱ्हे, नीलेश बडे, सुभाष गवई यांचे मार्गदर्शन लाभले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.