जालना ः जिल्ह्यातील २० शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. २०) बांबू लागवड (Bamboo Cultivation) चळवळीचे जिल्हा समन्वयक डॉ. सुयोग कुलकर्णी (Dr. Suyog Kulkarni) यांच्या नेतृत्वात अभ्यास दौऱ्यांतर्गत लोदगा (जि. लातूर) येथील बांबू लागवड चळवळीचे (Bamboo Cultivation Program) प्रणेते पाशा पटेल (Pasha Patel) यांच्या फिनिक्स फाउंडेशनच्या बांबू रोपे (bamboo Plant) लॅबोरेटरी, बांबू संबंधित विविध प्रकल्प आणि बाभूळगाव येथील प्लांटला भेट दिली. या वेळी पाशा पटेल यांच्याकडून बांबू लागवड, उपयोगिता आणि बांबूच्या बाजारपेठेची माहिती जाणून घेतली.
जालना जिल्ह्यात बांबू लागवड चळवळीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, अनेक शेतकरी लागवडीसाठी उत्सुक आहेत, त्या अनुषंगाने त्यांना शास्त्रोक्त माहिती मिळावी, यादृष्टीने डॉ. सुयोग कुलकर्णी यांनी काढलेल्या या अभ्यास दौऱ्यात आंतरवाली टेंभी, रांजणी, उटवद, कोठी येथील गौतम देशमुख, योगेश शिंदे, महेश कोल्हे आदी २० शेतकरी सहभागी झाले होते.
श्री. पटेल म्हणाले, ‘‘बांबू शेतीतून एकरी किमान एक ते दीड लाख रुपये उत्पन्न सहज शक्य आहे. एकदा बांबू लागवडीनंतर ते चार वर्षाने उत्पन्न देऊ लागते आणि ४०- ५० वर्षे पुन्हा लागवड करण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे बांबू शेतीकडे वळावे. बांबू तयार होणाऱ्या अठराशे वस्तूची त्यांनी माहिती दिली. या वस्तू त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दाखविल्या. शेतकरी म्हणताहेत कोण घेणार बांबू? आणि इंडस्ट्रीजवाले म्हणतात कुठंय बांबू? ही सध्याची परिस्थिती ‘कोंबडी आधी की अंडे आधी’ याप्रमाणे असला, तरी मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीतून ही समस्या दूर होईल. ठिकठिकाणी बांबू बाजारपेठा अस्तित्वात येत असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात लागवड होणे गरजेचे आहे. तुम्ही लागवड करा बांबू खरेदीची हमी मी देतो असा शब्द त्यांनी दिला.’’
या शेतकऱ्यांनी बाभूळगाव येथील तीन वर्षांच्या बांबू लागवडीच्या प्लांटला ही भेट देऊन पाहणी करत माहिती जाणून घेतली. त्यानंतर बांबू लागवड करण्याचा आणि त्यासाठी जिल्हा समन्वयक डॉ. सुयोग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली इतर शेतकऱ्यांनाही प्रोत्साहित करण्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी बोलून दाखवला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.